rajkiyalive

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात अजितराव घोरपडे विद्यालयाचा प्रथम क्रमांक

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात अजितराव घोरपडे विद्यालयाचा प्रथम क्रमांक : सांगली : महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. त्यामध्ये मिरज तालुक्यामधून व सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका एरियातून कळंबीच्या अजितराव घोरपडे विद्यालयाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून. तीन लाखाच्या बक्षिसास ही शाळा पात्र झालेली आहे, अशी माहिती या शाळेचे मुख्याध्यापक डी. एन. पाटील यांनी दिले

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात अजितराव घोरपडे विद्यालयाचा प्रथम क्रमांक

या विद्यालयात सतत नवनवीन उपक्रम सूर असतात भारत सरकारच्या स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालयात सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक जिल्हा पुरस्कार शाळेचे मुख्याध्यापक डी.एन.पाटील यांना मिळालेला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त या शाळेने राबवलेले उपक्रमाची इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे.

संपूर्ण शाळेचे सुशोभीकरण, संरक्षण भिंतीचे रंगरंगोटी, प्रबोधनात्मक विचार चित्रीकरण, सुविचार व बोलक्या भिंती, विद्यार्थ्यांची बचत बँक, परसबाग, नवभारत साक्षरता, मेरी माटी मेरा देश, पोषण आहार शिल्लकवर प्रक्रिया, महावाचन चळवळ, 100% उपस्थितीसाठी शाळेला राबवलेले उपक्रम, हस्ताक्षर, निबंध, पोस्टर, चित्रकला यामध्ये आयोजित केलेल्या स्पर्धा, स्वच्छता, मॉनिटर टप्पा दोन मध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेले व्हिडिओ, एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रम, समाजातील दानशूर व्यक्ती व लोकसहभागातून निर्माण केलेले मॉडेल स्कूल, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यामध्ये घेतलेले आघाडी, माजी विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, कार्पोरेट कंपन्या यांच्याकडून शाळेत झालेली भरीव मदत विद्यार्थ्यांनी शासकीय क्रीडा स्पर्धेत राज्यापर्यंत मिळवलेले यश प्लॅस्टिक मुक्त शाळा तंबाखू मुक्त शाळा स्वच्छ व सुंदर व आकर्षक रंगरंगोटी रंगसंगती शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी केलेली वर्ग सजावट स्पर्धा.

गेल्या 13 वर्षापासून दहावीचा शंभर टक्के निकालाची परंपरा स्कॉलरशिप एन एम एम एस परीक्षेत मिळालेले भरीव यश शाळेत कळंबी गावातील 240 विद्यार्थी आसपासच्या सात गावातील 510 विद्यार्थ्यांनी घेतलेला प्रवेश विद्यार्थी संख्येत सतत होणारी वाढ स्वयंरोजगार व्यापार उद्योग याबद्दल विद्यार्थ्यांनी केलेले मार्गदर्शन आर्थिक साक्षरता शाळेसाठी केलेले अभिनव उपक्रम शाळेतल्या मुलींसाठी चेंजिंग रूम अटल टिंकलिंग लॅब विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी राबवलेले अभिनव उपक्रम लोकसभागातून स्नेहभोजन या सर्व बाबींचा विचार करण्यात आला.

शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद सांगली यांच्याकडून केंद्र पातळीवर तालुका स्तर आणि जिल्हास्तर तपासणी पथकाकडून तपासणी झाल्यानंतर मिरज तालुका व सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका एरिया या सर्व विभागातून प्रथम क्रमांक या विद्यालयास तीन लाखाचे बक्षीस पारितोषक शिक्षण विभागाने जाहीर केलेले आहे. या कामासाठी शिक्षण प्रसारक मंडळ कळंबी अजितराव घोरपडे विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील पालक विद्यार्थी गावातील नागरिकांनी या अभियानामध्ये यशस्वी होण्यासाठी या शाळेला भरीव मदत केली शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी या सर्वांनी शाळेचे व मुख्याध्यापक डी.एन.पाटील व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज