naharashtra govt.news : घरकुल लाभार्थ्यांना मिळणार पाच ब्रास वाळू : राज्य सरकारने नुकतेच सुधारित वाळू धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार लाभार्थ्यांना घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत मिळणार आहे. सांगली जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात 32 हजारांवर घरकुले मंजूर आहेत. यापैकी बांधकाम अपूर्ण असणार्या लाभार्थ्यांना मागणीनुसार वाळू उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
naharashtra govt.news : घरकुल लाभार्थ्यांना मिळणार पाच ब्रास वाळू
ग्रामीणमध्ये 32 हजारांवर लाभार्थी ः मनपा क्षेत्रात 91 लाभार्थी
दरम्यान सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील 598 मंजूर घरकुलांपैकी 272 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर अपूर्ण 91 लाभार्थ्यांपैकी 13 लाभार्थ्यांनी महापालिकेकडे वाळूसाठी अर्ज दिला आहे. यापैकी 9 लाभार्थ्यांना येत्या दोन-तीन दिवसांमध्ये वाळू उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रीपदाचा पदभार स्विकारताच सुधारीत वाळू धोरणाचे संकेत दिले होते. नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकित यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यामध्ये वाळू डेपो पध्दत बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेसह अन्य योजनांमधून मंजूर असणार्या घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णयही घेण्यात आला. यामुळे लाखो घरकुल धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हरीत लवादाच्या आदेशाने सांगली जिल्ह्यात वाळू उपसा करण्यास बंदी आहे. परिणामी सोलापूर जिल्ह्यातील वाळूवर इथल्या बांधकामांचे भवितव्य अवलंबून होते. यामुळे वाळूच्या दरामध्येही मोठी वाढ झाली होती. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर वाळूचे दर गेले होते.
परिणामी प्रधानमंत्री आवाससह अन्य योजनांमधून सुरु असलेल्या घरकुल बांधकामांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शासनाच्या या नव्या वाळू धोरणामुळे योजनांमधील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सांगलीत वाळू उपसा करण्यास बंदी आहे. त्यामुळे वाळू उपलब्ध करुन देण्याचे संकट प्रशासनावर आहे. परंतू यातूनही मार्ग काढण्यात आला आहे. अवैध वाळू उत्खनन, विक्री, वाहतूक करताना जप्त केलेली वाळू घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
naharashtra-govt-news-gharkul-beneficiaries-will-get-five-brass-sand
यासाठी लाभार्थ्यांना संबधित महसूल यंत्रणेकडे अर्ज करावा लागणार आहे. केवळ बांधकाम अपूर्ण असणार्या लाभार्थ्यांनाच मोफत वाळू उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मनपा क्षेत्रात 91 लाभार्थी
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घरकुलांचे 32 हजारांवर लाभार्थी आहेत. तर सांगली, मिरज आणिा कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील लाभार्थ्यांची संख्या 598 इतकी आहे. यापैकी बांधकाम अपूर्ण असणार्यांनाच वाळू मिळणार आहे. दरम्यान महापालिका क्षेत्र अशा लाभार्थ्यांची संख्या 91 इतकी आहे. यापैकी 13 लाभार्थ्यांनी महापालिकेकडे वाळूसाठी अर्ज केले होते. त्यापैकी 9 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यांना येत्या दोन-तीन दिवसांमध्ये प्रत्येकी पाच ब्रास वाळू सांगली अप्पर तहसिलदार कार्यालयातून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.