rajkiyalive

ncp news : लवकरच राष्ट्रवादीत बड्यांचे पक्षप्रवेश: रूपाली चाकणकर

ncp news : लवकरच राष्ट्रवादीत बड्यांचे पक्षप्रवेश: रूपाली चाकणकर : सांगलीतील पूर्वीच्या काळात माझ्याबरोबर काम केलेल्या अनेक महिलांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पण जिल्ह्याला वेगळी उत्सूकता आहे. पण येत्या कालावधीमध्ये मोठे पक्ष प्रवेश होतील, असा विश्वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.

ncp news : लवकरच राष्ट्रवादीत बड्यांचे पक्षप्रवेश: रूपाली चाकणकर

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर सांगलीच्या दौर्‍यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हा कार्यालयाला भेट दिली. तेथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, राज्यात सोनोग्राफी सेंटरची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचे आढळून येत आहे. कोल्हापूर गर्भपात प्रकरणी कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. सीमालगत भागात असे प्रकार होत आहेत. याला आळा घालण्यासाठी तपासणी मोहिम सुरू करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते. हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असू शकत नाही. या घटनेचा मी निषेध करते. भुजबळ यांच्याबाबतीत वरिष्ठ योग्य ते निर्णय घेतील, पण हे कृत्य चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. काहींनी नागपूर पेट्रोलपंप चालक महिलेला माफी मागावी लावली होती. ही घटना दुर्दैवी असून या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, कार्याध्यक्ष जमील बागवान, महिला आघाडीच्या राधीका हारगे, जयंत जाधव आदी उपस्थित होते.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज