rajkiyalive

ncp pawar news : शरद पवारांची 45 उमेदवारांची यादी; घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान

मुंबई :

ncp pawar news : शरद पवारांची 45 उमेदवारांची यादी; घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (डहरीरव रिुरी) पक्षाची पहिली 45 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, शिवसेना ठाकरे गटाप्रमाणेच शरद पवारांनीही राष्ट्रवादीच्या (छउझ) अजित पवारांना तगडं आव्हान दिलंय. सर्वाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात थेट अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार म्हणजेच काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे. तर, मंत्री धर्मराव आत्राम यांच्याविरुद्ध त्यांच्या लेकीलाच शरद पवारांनी मैदानात उतरवलं आहे. अहेरी मतदारसंघातून भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे, महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या लढाईत घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान निर्माण झालंय.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र आहेत, त्यापैकीच एक म्हणजे अहेरी विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघाचे राजकीय दृष्टिकोनातून वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे युती असो की आघाडी, या दोघांनीही अहेरी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं आहे. पूर्वी गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे धर्मरावबाबा आत्राम असे समीकरण होते. मात्र, आत्राम यांनी आता अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. आत्राम कुटुंबातील ह्या घरफुटीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणं देखील पूर्णपणे बदलली आहेत.

अखेर आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाली असून बाप विरुद्ध लेक असा सामना फिक्स झालंय. तर, बारामती मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना तिकीट देऊन अजित पवारांना मोठं आव्हान उभा केलंय. त्यामुळे, राज्याचं लक्ष या मतदारसंघातील लढतीकडे लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची यादी
जयंत पाटील – इस्लामपूर
अनिल देशमुख- काटोल
राजेश टोपे- घनसावंगी
बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा
शशिकांत शिंदे – कोरेगाव
जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
हर्षवर्धन पाटील- इंदापूर
प्राजक्त तनपुरे -राहुरी
अशोकराव पवार- शिरुर
मानसिंगराव नाईक- शिराळा
सुनील भुसारा- विक्रमगड
रोहित पवार- कर्जत जामखेड
विनायकराव पाटील- अहमदपूर
राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
सुधाकर भालेराव- उदगीर
चंद्रकांत दानवे- भोकरदन
चरण वाघमारे- तुमसर
प्रदीप नाईक- किनवट
विजय भांबळे-जिंतूर
पृथ्वीराज साठे- केज
संदीप नाईक- बेलापूर
बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
दिलीप खोडपे- जामनेर
रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर
रविकांत बोपछे- तिरोडा
भाग्यश्री अत्राम- अहेरी
बबलू चौधरी- बदनापूर
सुभाष पवार- मुरबाड
राखी जाधव- घाटकोपर पूर्व
देवदत्त निकम- आंबेगाव
युगेंद्र पवार – बारामती
संदीप वर्पे- कोपरगाव
प्रताप ढाकणे- शेवगाव
राणी लंके- पारनेर
मेहबूब शेख- आष्टी
करमाळा-नारायण पाटील
महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर
प्रशांत यादव- चिपळूण
समरजीत घाटगे – कागल
रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ
प्रशांत जगताप -हडपसर
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज