राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांचा आरोप
जनप्रवास । प्रतिनिधी
UMESH PATIL ON SUPRIYA SULE : सुप्रियाताई मुख्यमंत्री पदाच्या दाव्याने राष्ट्रवादीत फूटसांगली ः उद्धव ठाकरेनंतर अडीच वर्षांनी सुप्रियाताई सुळे यांना मुख्यमंत्री करण्याबाबतचा गुप्त समझोता पक्षाध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झाला होता. या कारणांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे राज्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केला. याशिवाय 2004 मध्ये काँग्रेसपेक्षा जादा आमदार निवडून येवूनही पवार साहेबांनी स्वतःच्या मुख्यमंत्रीपद का घेतले नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
UMESH PATIL ON SUPRIYA SULE : सुप्रियाताई मुख्यमंत्री पदाच्या दाव्याने राष्ट्रवादीत फूट
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले तर ते ज्युनिअर अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, सुनिल तटकरे यांच्यापेक्षा ज्युनिअर होते. त्यामुळे त्यांना विरोध केल्याचे वक्तव्य केले. त्याबाबत बोलताना राज्य प्रवक्ते पाटील म्हणाले, खासदार राऊत हे खोटी माहिती देत आहेत. शिंदे यांना अजितदादा आणि वळसे-पाटील यापैकी कुणीही विरोध केला नव्हता. याउलट उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांनी पुत्रप्रेमापोटी आदित्य यांना मुख्यमंत्री करण्याचा घाट घातला होता.
UMESH PATIL ON SUPRIYA SULE : सुप्रियाताई मुख्यमंत्री पदाच्या दाव्याने राष्ट्रवादीत फूट : आदित्य यांच्या नेतृत्वात कुणीही काम करण्यास तयार झाले नसते.
मात्र साधी ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिकेची निवडणूक न लढविणारे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आले. त्यांना कुठल्याही संसदिय कामकाजाची, तसेच अनुभव नसताना ठाकरे यांना मुख्यमंत्री केले, असा प्रश्न आहे.
भुजबळ यांना मुख्यमंत्री केले असते तर पक्षात फूट पडली असती.
2004 मध्ये सर्वाधिक आमदार असूनही सक्षम नेता नसल्याने मुख्यमंत्रीपद घेतले नसल्याचा वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे, त्यावर पाटील म्हणाले, 2004 मध्ये काँग्रेसपेक्षा काँग्रेसपेक्षा जादा आमदार निवडून येवूनही पवार साहेबांनी स्वतःच्या मुख्यमंत्रीपद का घेतले नाही.त्यावेळी अजितदादा तीनवेळा आमदार झाले होते. वळसे-पाटील, छगन भुजबळ, पद्मसिंह पाटील, आर. आर. पाटील, जयंत पाटील, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यासारखे जेष्ठ नेते होते. ते सक्षम वाटत नव्हते. जेष्ठ नेते भुजबळ यांना मुख्यमंत्री केले असते तर पक्षात फूट पडली असती. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री होवू न देणे म्हणजे पवारांच्या मनात असुरक्षिततेची भावना होती, असा आरोप राज्य प्रवक्ते पाटील यांनी केला.
UMESH PATIL ON SUPRIYA SULE : सुप्रियाताई मुख्यमंत्री पदाच्या दाव्याने राष्ट्रवादीत फूट जेष्ठ नेते नाराज झाल्याने पवारांची साथ सोडली
शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या एकत्रित प्रवासात अडीच वर्षे ठाकरे आणि उर्वरित अडीच वर्षाच्या कालावधीत सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करण्याचे ठरले होते. ही बाब उघडकीस आल्याने राष्ट्रवादीतील जेष्ठ नेते नाराज झाले, त्यामुळे पवारांची साथ सोडून अजितदादांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे राज्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.