rajkiyalive

nitin gadkari in islampur : आरआयटीच्या वसतीगृह, जिम्नॅशिअमचे सोमवारी नितीन गडकरींच्याहस्ते उद्घाटन

nitin gadkari in islampur : आरआयटीच्या वसतीगृह, जिम्नॅशिअमचे सोमवारी नितीन गडकरींच्याहस्ते उद्घाटन

nitin gadkari in islampur : आरआयटीच्या वसतीगृह, जिम्नॅशिअमचे सोमवारी नितीन गडकरींच्याहस्ते उद्घाटन : येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवार दि.17 फेब्रुवारी 2025 रोजी नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह आणि अत्याधुनिक जिम्नॅशिअमचे उद्घाटन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याहस्ते होणार असल्याची माहिती कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्रा.आर.डी.सावंत व महाविद्यालयाचे संचालक डॉ. पी.व्ही.कडोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

nitin gadkari in islampur : आरआयटीच्या वसतीगृह, जिम्नॅशिअमचे सोमवारी नितीन गडकरींच्याहस्ते उद्घाटन

प्रा.आर.डी.सावंत म्हणाले, महाराष्ट्रात प्रथमच प्री-इंजिनियर्ड बिल्डिंग अत्याधुनिक आणि प्रगत बांधकाम तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरआयटीतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह निर्माण झाले असून अलीकडच्या काळातील उत्कृष्ट स्थापत्य नमुना म्हणून या वास्तूचा उल्लेख होणार आहे.

वसतिगृहातील सर्व रूम वातानुकूलित असून या इमारतीच्या तळमजल्यात एकाच वेळी 1 हजार विद्यार्थी जेवण करू शकतील एवढ्या डायनिंग हॉलची सोय आहे. अत्याधुनिक जिम्नॅशिअममध्ये ऑलिम्पिक स्पर्धकांच्या सरावासाठी वापरल्या जाणार्‍या मशीन्स उपलब्ध आहे. जिम्नॅशिअम बिल्डिंग वातानुकूलित असून योग सेन्टर, स्टीम बाथ सारख्या सुविधा आहेत. डॉ.पी.व्ही.कडोले म्हणाले, या शैक्षणिक वर्षात अफगाणिस्तान, नेपाळ, साऊथ सुदान, झिम्बाब्वे, बांगलादेश, युएसए, आयवोरी पोर्ट या देशातून एकूण 57 विद्यार्थ्यांनी आरआयटी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.

अलीकडेच आरआयटीने अमेरिका, यु के, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, तैवान आणि जर्मनी या देशातील 45 विद्यापीठाशी सामंजस्य करार केला आहे. भविष्यात आरआयटीत शिकणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढणार असून हि गरज लक्षात घेता आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यार्थी वसतिगृह हि वास्तू आरआयटीने उभारली आहे.

उद्घाटनासाठी आमदार, खासदार, उद्योजक, शेतकरी, डॉक्टर, वकील, इंजिनीयर्स, पत्रकार, सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, नागरिकांना निमंत्रित केले आहे. यावेळी गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य प्रा.शामराव पाटील, रजिस्ट्रार सारिका पाटील, डॉ.कृष्णाजी पाटील, डॉ. सचिन पाटील, डॉ.अमोल आडमुठे, प्रा.वैभव धोत्रे उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज