nitin gadkari rit news : आरआयटीत आंतराष्ट्रीय दर्जाचे अभियंते तयार होतील ः ना.नितीन गडकरी : गुणवत्ता प्रदान शिक्षण देणार्या इस्लामपूरच्या आर आय टी संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभियंते तयार होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भविष्यातील बदलते तंत्रज्ञान हेच भारताच्या प्रगतीची दिशा ठरवणार आहे. भारत देशाला समृद्ध करायच असेल तर शहरांबरोबर ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
nitin gadkari rit news : आरआयटीत आंतराष्ट्रीय दर्जाचे अभियंते तयार होतील ः ना.नितीन गडकरी
राजकारणात वैचारिक मतभेद असले तरी मनभेद असता कामा नये. राजकारण हे निवडणुकीपुरते असायला पाहिजे. त्यानंतर सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे. तरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनातील आत्मनिर्भर भारत निर्माण होईल.

इस्लामपूर येथे राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आंतरराष्ट्रीय वसतिगृह आणि जिम्नॅशिअम इमारतीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ.जयंत पाटील होते. यावेळी आर आय टी चे प्रमुख भगतसिंह पाटील, माजी मंत्री आ.सुरेश खाडे, खा.विशाल पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आ.अरुण लाड, आ.सुहास बाबर, आ.रोहित पाटील, माजी आ.मानसिंगराव नाईक, दिलीपतात्या पाटील, प्रतिक पाटील, राजवर्धन पाटील, आदित्य पाटील, देवराज पाटील, आर.डी.सावंत, शामराव पाटील, पी.व्ही.कडोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना.नितीन गडकरी म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक ही भविष्यातील पिढीला निर्माण करण्यासाठी होणारा खर्च आहे.
बदलत्या काळात आपल्या विकासाचा गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाला आत्मसात करून भारतातील ग्रामीण भाग सुजलाम सुफलाम करणे गरजेचे आहे. आरआयटी महाविद्यालयामध्ये सुरु असणारे उपक्रम या ग्रामीण भागाला जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान देऊ शकतात. कोणत्याही व्यक्तीचे नेत्रदान करता येतात पण दूरदृष्टी दान करता येत नाही. राजारामबापूंच्या दूरदृष्टीमुळे शिक्षण व्यवस्थेची पायाभरणी केली.

जयंत पाटील यांनी भविष्याच्या वेध घेत शिक्षण संस्थांची निर्मिती केली.
कासेगाव शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल आहे.जगातील सर्वात तरुण प्रशिक्षित अभियांत्रिकेची पदवी असणारे मनुष्यबळ फक्त भारतामध्ये आहे. ज्यामुळे आपण भविष्यात जगावर राज्य करू शकतो. शेतकरी अन्नदाता होता, तो उर्जादाता, इंधनदाता बनला आहे. लवकरच हवाई इंधन दाता बनेल. यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणार आहे.
आ.जयंत पाटील म्हणाले, आरआयटी महाविद्यालयाच्या 42 वर्षाच्या जडणघडणीत अनेक मैलाचे दगड पार केले.
देशातील पहिल्या शंभर संस्थांपैकी एक अभियांत्रिकी संस्था आहे. भारताचा जागतिक पातळीवर चेहरा मोहरा बदलणारा एकमेव नेता म्हणून नितीन गडकरी यांची ओळख आहे. जे नाविन्यपूर्ण आणि भविष्याचा वेध घेणारे आहे त्याला गडकरी साहेबांचा पाठिंबा असतो. गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या किमान तयार करु नका. कशाची बातमी कराल याच्यावर पत्रकारतेचा दर्जा ठरतो. पत्रकाराने एक बातमी तयार केली अन देशभर त्याच्यावर लोक चिंतन करायला लागली. त्याच मनाला शल्य वाटते.
दोन पक्षाची माणस एकाच व्यासपीठावर चांगल्या उद्देशाने येवू शकत नाहीत अशी धारणा झालेली आहे त्याबद्दल न बोललेल चांगले.
रतन टाटांपासून अनेक मान्यवरांनी या संस्थेला भेट दिली. विरोधी पक्षांचे नेते यापुर्वी येवून गेले आहेत. ही संस्था आहे, येथे राजकारण करत नाही. या कार्यक्रमास बाळासाहेब होनमोरे, मनोज शिंदे, संजय बजाज, वैभव शिंदे, अॅड.चिमण डांगे, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, विश्वास डांगे, दादासो पाटील, बी.के. पाटील, भीमराव पाटील, अॅड. बाबासाहेब मुळीक यांच्यासह पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, आरआयटीचे सर्व विद्यार्थी, डीन्स, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरआयटीचे डायरेक्टर डॉ.पी.व्ही.कडोले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर.डी.सावंत यांनी आभार मानले.
चौकटः- पेठ-सांगली रस्ता दर्जेदार होणार पेठ-सांगली महामार्ग अनेक वर्षापासून रखडला होता. या रस्त्याचे काम करण्याचा ठेका 46 टक्के कमी दराने घेतला आहे. हे काम कसे होईल याबाबत आ.जयंत पाटील यांच्यासह अनेकांच्या मनात साशंकता होती. रस्ता चांगला झाला पाहिजे अशा सुचना संबंधित ठेकेदाराला दिली होती. सध्या 80 टक्के काम पुर्ण झाले असून खुद्द जयंत पाटील यांनी काम चांगले झाल्याचे सांगितल्याने मनापासून आनंद झाल्याची भावना ना.नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
सांगली, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला अच्छे दिन
केंद्र सरकारच्या माध्यामातून पुणे-बेंगलोर महामार्ग करण्याचे काम सुरु आहे. सांगली, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातून हा महामार्ग जाणार आहे. त्यामुळे दुष्काळी भागाला लवकरच चांगले दिवस येतील. असा आशावाद ना.नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
चौकटः-
राज्यसरकारने गडकरी साहेबांचा आदर्श घ्यावा पेठ-सांगली रस्ता दर्जेदार झाला आहे.
रस्त्याचे काम देरसे लेकीन दुरुस्त झाले आहे. जिल्ह्यात असा कोणताच महामार्ग झाला नाही. टेंडरपेक्षा 46 टक्के कमीने रस्ता टेंडर आहे. महाराष्ट्र सरकारने केलेली कामे 20 ते 37 टक्के जादा दराने केली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने गडकरी साहेबांचा आदर्श घेणे जास्त चांगले आहे. असा खोचक टोला आ.जयंत पाटील यांनी लगावला.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



