p.m. awas yojna sangli news : जिल्ह्यात 5 हजार लोकांना नकोय घरकुल: . प्रधानमंत्री आवासच्या घरकुलांसाठी सरकारकडून घरकुल, मनरेगा आणि स्वच्छ भारत या तिन्ही योजनांतून अवघे 1 लाख 48 हजार रुपयांचे अनुदान मिळते. याशिवाय 90 दिवसात घरकुल पूर्ण करण्याची अट आहे. या निधीतून बांधकाम करणे अशक्य असल्याने जिल्ह्यातील 27 हजार लाभार्थ्यांपैंकी 5 हजार 365 जणांनी घरकुल नाकारल्याचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाकडे दिले आहे.
p.m. awas yojna sangli news : जिल्ह्यात 5 हजार लोकांना नकोय घरकुल : जिल्ह्यात 5 हजार लोकांना नकोय घरकुल : जिल्ह्यात 5 हजार लोकांना नकोय घरकुल: जिल्ह्यात 5 हजार लोकांना नकोय घरकुल
1.48 लाखात घर कसे बांधायचे, 90 दिवसात बांधकाम करणेही अशक्य
गरिबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना आदी योजना राबविण्यात येतात. सद्यस्थितीत बांधकाम साहित्याचा दर लक्षात घेता या योजनांसाठी देण्यात येणारे अनुदान अत्यंत कमी आहे. या निधीतून बांधकाम करणे अशक्य असल्याने जिल्ह्यातील 27 हजार लाभार्थ्यांपैंकी 5 हजार 365 जणांनी घरकुल नाकारल्याचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाकडे दिले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. जिल्ह्यात गेल्या चार वर्षापासून 59 हजार लाभार्थी घरकुलांच्या प्रतिक्षेत आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये जिल्ह्यासाठी अवघे 5 हजार 248 घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले होते. त्यामुळे हजारो लाभार्थींना पुन्हा प्रतिक्षा करावी लागली होती. सर्वांसाठी घरे केंद्र शासनाच्या धोरणाअंतर्गत सांगली जिल्हयाकरिता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रं.2 अंतर्गत 27 हजार 459 ऐवढे अतिरिक्त उदिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे मागील वर्षीचे आणि नव्याने आलेले मिळून 32 हजार 707 एवढे घरकुलांचे उदिष्ट सांगली जिल्हयास प्राप्त झाले.

p-m-awas-yojna-sangli-news-5-thousand-people-in-the-district-do-not-want-shelter
घरकुल मंजूरी प्रक्रिया जिल्हयात जोमात सुरु असून सर्व लाभार्थ्यांना एका घरकुल बांधकामाकरीता 1 लाख 20 हजार चार टप्प्यात जमा होतील. नव्याने मंजूर झालेल्या 27 हजार लाभार्थीना शनिवारी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते घरकुलाचे मंजुरी पत्र देण्यात आले, याशिवाय 16 हजार 247 जणांना 15 हजार रुपयांप्रमाणे पहिला हप्ता बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. यावेळी घरकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. परंतु जिल्ह्यातील 5 हजार 365 लाभार्थींनी घरकुल मंजूर झाले असतानाही नाकारले आहे. सरकारकडून दिल्या जाणार्या रकमेत घराचे बांधकाम करता येणार नाही, उर्वरित पैशाची व्यवस्था नसल्याने घरकुल नाकारले आहे, याबाबत संबंधित लाभार्थींनी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेला लेखी पत्र दिले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ग्रामीण भागात 1.48 लाख तर शहरी भागाला 2.65 लाखाचे अनुदान देण्यात येते.
ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना सर्व साहित्य शहरातूनच आणावे लागते, त्यामुळे ग्रामीण व शहरी असा दुजाभाव कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वास्तविक पाहता बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत. मजुरीसुद्धा वाढली आहे, त्यामुळे घरकुल पूर्ण करणे आव्हानात्मक असल्याचे चित्र दिसून येते.

सरकारकडून घरकुलासाठी मिळणार्या अनुदानात घरकुलाचे काम पूर्ण करणे अशक्य आहे.
शासनाच्या नियमाप्रमाणे 269 स्वेअर फूट बांधकाम गृहित धरले जाते, मात्र तेवढ्यात दोन खोल्याही पूर्ण होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना अक्षरशः कर्ज काढून बांधकाम करावे लागत आहे. पैशाची तजवीज नसल्याने जिल्ह्यातील 5 हजार 365 लाभार्थींनी घरकुल नाकारल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अनुदानात वाढ करुन सरसकट तीन लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.
घरकुलास सरसकट 3 लाख अनुदान द्या
शहरी भागातील लाभार्थी व ग्रामीण भागातील लाभार्थी यांना मिळणार्या अनुदानात तफावत आहे. वास्तविक पाहता ग्रामीण भागात व शहरी भागात बांधकामाचा खर्च सारखाच येतो. ग्रामीण भागात बांधकाम करायचे असेल तर बांधकाम साहित्य शहरातूनच आणावे लागते. त्यामुळे सरसकट किमान तीन लाख रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.
90 दिवसांत बांधकाम पूर्ण कसे करायचे ?
प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेल्या सर्व घरकुल लाभार्थ्यांनी किमान 90 दिवसांत घरकुल बांधकाम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. सरकारकडून चार टप्प्यात अनुदान मिळते. पहिला हप्ता 15 हजार, दुसरा 70 हजार तिसरा 25 हजार आणि चौथ्या टप्प्यात 5 हजार रुपये दिले जातात. या अनुदानातून 90 दिवसांत बांधकाम पूर्ण करण्याचे लाभार्थींपुढे आव्हान आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



