rajkiyalive

p.m. kisan yojna news : 16 हजार लाभार्थ्यांना मिळणार सव्वादोन कोटी

p.m. kisan yojna news : 16 हजार लाभार्थ्यांना मिळणार सव्वादोन कोटी

p.m. kisan yojna news : 16 हजार लाभार्थ्यांना मिळणार सव्वादोन कोटी: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व 10 लाख लाभार्थ्यांना एकक्लिक वर पहिला हप्ता वितरण कार्यक्रम शनिवारी (दि. 22) पुणे येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा कार्यक्रमही सांगलीत होणार असून 16 हजार लाभार्थींना 15 हजाराप्रमाणे पहिला हप्ता लाभार्थींच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

p.m. kisan yojna news : 16 हजार लाभार्थ्यांना मिळणार सव्वादोन कोटी

प्रधानमंत्री आवास योजनेचा आज पहिला हप्ता मिळणार

बालेवाडी (पुणे) येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास व पंचायत राज जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर घरकुल मंजूर लाभार्थ्यांना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दिसण्याबाबत आयोजन करणेत आले आहे. सांगलीत जिल्हास्तरीय कार्यक्रम पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 16 हजार लाभार्थींना घरकुलाचा पहिला हप्ता 15 हजाराप्रमाणे खात्यावर वर्ग होणार आहे. जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात सव्वादोन कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.

p-m-kisan-yojna-news-16-16-thousand-beneficiaries-will-get-rs

सांगलीतील कृष्णा मॅरेज हॉल येथे दुपारी साडेतीन वाजता हा कार्यक्रम होणार असून यावेळी पाचशे लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. तालुकास्तरीय कार्यक्रम संबंधित आमदारांच्या अध्यक्षतेखाली तीनशे लाभार्थ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेचे आयोजन करून सरपंच, आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये 70 ते 100 लाभार्थी यांचा मेळावा तसेच ग्रामसभा घेण्यात येत आहे.
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 31946 इतक्या घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त असून शंभर टक्के मंजुरी व प्रथम हफ्ता वितरणाची कार्यवाही सुरु आहे.

p-m-kisan-yojna-news-16-16-thousand-beneficiaries-will-get-rs

राज्यस्तरावरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ग्रामपंचायत स्तरावर दिसण्यासाठी कार्यक्रमाचे ठिकाणी सुविधा करण्यात आली असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन सदर गृहोत्सव साजरा करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज