rajkiyalive

प्लॉट दुसर्‍याला विकल्याच्या रागातून एकास बेदम मारहाण

 

प्लॉट दुसर्‍याला विकल्याच्या रागातून एकास बेदम मारहाण : सांगली : शहरातील विश्रामबाग परिसरात असणार्‍या विजयनगर मध्ये कवठेमहांकाळ मधील प्लॉट दुसर्‍याला विकल्याच्या रागातून दोघांनी मिळून एकास सिमेंटचे ब्लॉक आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. सदरचा प्रकार हा गुरुवार दि. 02 मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी जखमी दीपक रंगराव पवार (वय 43 रा. विजयनगर मूळ रा. कवठेमहांकाळ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणार्‍या उमेश घाडगे (वय 40) यांच्यासह एकावर गुन्हा दाखल केला आहे.

प्लॉट दुसर्‍याला विकल्याच्या रागातून एकास बेदम मारहाण

याबाबत अधिक माहिती अशी की, जखमी दीपक पवार हे मूळचे कवठेमहांकाळ शहरातील विद्यानगर मध्ये राहत होते सध्या ते शहरातील विजयनगर येथे राहतात. संशयित दोघेजण देखील मूळचे कवठेमहांकाळ येथील असून सध्या विद्यानगर मध्येच राहतात. गुरुवार दि. 02 मे रोजी संशयितांनी पवार यांच्या घरासमोर जाऊन तुझा कवठेमहांकाळ येथील प्लॉट मला न देता दुसर्‍याला विकला आहेस असे म्हणून शिवीगाळ करून तुला आता सोडत नाही असे म्हणून सिमेंटच्या ब्लॉकने छातीवर मारून जवळ पडलेली काठी घेऊन बेदम मारहाण केली.

यावेळी झटापटीत मोबाईल पडून नुकसान झाले. घडलेल्या या घटनेनंतर जखमी दीपक पवार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

घरफोडी करणारा तरुण सांगलीत जेरबंद : सव्वा लाखांचा ऐवज हस्तगत. एलसीबीची कारवाई.

शहरातील विविध परिसरात घरफोडी करणार्‍या तरुणास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या तरुणाकडून चोरीतील दागिन्यांसह 1 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सांगली रेल्वे स्थानक जवळ सदरची कारवाई केली. या प्रकरणी विनायक बजरंग खुटाळे (वय 30 रा. अभिनंदन कॉलनी, सांगली) या तरुणास अटक केली आहे.

सांगली शहरात वाढत्या घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी संशयितांचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी दरिबा बंडगर हे रेल्वे स्थानक परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली कि, संशयित विनायक खुटाळे हा रेल्वे स्टेशनच्या पूर्वेस असणार्‍या हरिप्रिया अपार्टमेंट समोर दुचाकीवर थांबला असून त्याच्याजवळ घरफोडीतील सोन्याचे दागिने आहेत. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी तातडीने त्याठिकाणी सापळा रचून संशयित खुटाळे याला ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ सोन्याची वेढणं असलेली सोन्याची अंगठी मिळाली.

याबाबत कसून चौकशी केली असता त्याने सांगितले कि, त्याचे नातेवाईक असलेले मारुती गलांडे यांच्या घरी भरदिवसा चोरी केल्याची कबुली दिली. यावेळी त्याच्याकडून 1 लाख 15 हजारांचे सोन्याचे दागिने जप्त करत पुढील तपासासाठी संजयनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, उपनिरीक्षक कुमार पाटील, हेडकॉन्स्टेबल दरिबा बंडगर, बिरोबा नरळे, संदीप गुरव, सागर लवटे, अमर नरळे, संदीप नलवडे, उदयसिंह माळी यांच्या पथकाने केली.

——————————-

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज