दिनेशकुमार ऐतवडे, जनप्रवास
राज्यात नुकताच मोठा राज कीय भूकंप झाला. राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांसह थेट सत्तेत सहभागी होत सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे. अजित पवारांचे पुढचे टार्गेट आमदार जयंत पाटील हेच असणार आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांना जिल्ह्यातच रोखण्यासाठी आत्तापासूनच रणनिती आखण्यात येत आहे . त्याचाच एक भाग म्हणून पेठचे रा हूल महाडिक यांनी नुकताच अजित पवार यांची मुंबईत भेट घेउन त्यांचा सत्कार केला.
विरोधकांमध्ये आजपर्यंत कधीच एकमत झाले नाही.
परंतु सध्याच्या परिस्थितीत राहूल महाडिक यांचे नाव सर्वसंमतीने पुढे येण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांना जर मतदार संघातच रोखून धरायचे असेल तर राहूल महाडिक यांच्याशिवाय पर्याय नाही. असे विरोधकांमध्ये एकमत झाल्याचे कळत आहे. राहूल महाडिक यांनीही जयंत पाटील यांना घेरण्याची तयारी केली आहे. 1990 पासून इस्लामपूर मत र संघात आपली मजबूत पकड निर्माण केलेल्या माजी मंत्री जयंत पाटील यांनी राज्याच्या राजकारणातही मोठी झेप घेतली.
सध्याच्या घडीला राज्यस्तरावर त्यांचे नाव घेतले जाते. शरद पवार यांचे अगदी विश्वासू साथीदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. एवढ्या मोठ्या राजकीय भूकंपानंतरही जयंत पाटील यांनी मनाचा तोल जावू न देता शरद पवार यांची खंबीर साथ केली आहे.
हेही वाचा
जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार
मतदार संघातच रोखून ठेवायचा प्लॅन
जयंत पाटील यांच्यावर सध्या राज्याच्या राष्ट्रवादीची जबाबदारी असली तरी त्यांना मतदार संघातच रोखून ठेवायचा प्लॅन विरोधकांनी रचला आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात वाळव्याच्या गौरव नायकवडींना शिवसेनेचे तिकीट मिळाले. परंतु इस्लामपूर नगरीचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून तिरंगी लढतीचे चित्र निर्माण केले. याचा फटका विरोधकांना बसला.
जयंत पाटील लाखाच्या फरकाने निवडून आले.निवडणुकीनंतर सर्व विरोधकांनाची तोंडे सर्व बाजूला झाली. रयत संघटनेचे सदाभाउ खोत, शिवसेनेचे गौरव नायकवडी, भाजपचे राहूल महाडिक, विक्रम पाटील, शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव पवार, भाजपचे निशिकांत पाटील, काँग्रेसचे जितेंद्र पाटील हे सर्व जयंतरावांचे विरोधक म्हणून ओळखले जातात. परंतु ऐन निवडणुकीच्या काळात विरोधकात फूट पडते, असा आजपयर्ंतचा इतिहास आहे.
राज्यभरू फिरून पक्ष पुन्हा उभारणार
येथून पुढचे राजकारण मात्र वेगळे असणार आहे. राज्य पातळवीर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीमध्ये तर हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आमदार जयंत पाटील आणि शरद पवार गटाकडे राहिले आहेत. राज्यभरू फिरून पक्ष पुन्हा उभारणार, असे शरद पवार आणि जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. राज्याच्या राजकारणात फिरत असताना जयंत पाटील यांना इस्लामपूर मतदार संघात फारसा वेळ द्यायला मिळणार नाही, याचाच फायदा विरोधक उचलण्याच्या तयारी आहेत. त्यांच्या सोबतीला आता अजित पवार असणार आहेत. कारण जयंत पाटील आणि अजित पवार यांचे प्रेम सर्वश्र्र्रुत आहे. जयंत पाटील यांना मतदार संघातच रोखून धरण्यासाठी मोठा डाव टाकण्याच्या तयारीत विरोधक आहेत. शांत आणि संयमी म्हणून राहूल महाडिक यांच्याकडे पाहिले जाते. सम्राट यांच्यासारखा आक्रमकपणा त्यांच्याकडे नसला तरी सर्वसामान्यांना हाताशी धरून राजकारण करण्याची त्यांची कला आहे. वनश्र्री नाना महाडिक मल्टीस्टेटच्या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत ते पोहोचले आहे.
जयंत पाटील यांच्या विरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणणे हे आव्हान
मतदार संघातील बहुतांश गावामध्ये त्यांनी आपला गट तयार केला आहे. नानासाहेब महाडिकांचे स्वप्न सत्कार उतरवण्यासाठी त्यांची आत्तापासूनच चंग बांधला आहे. राज्यस्तरावरही त्यांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच राहूल महाडिक यांनी त्यांचा मुंबईत जावून सत्कार केला. येणार्या विधानसभेला आपण तयार असल्याचे दाखवून दिले आहे. जयंत पाटील यांच्या विरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणणे हे मात्र त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये एकमत यंदा अडचण येणार नाही. जवळच्या शिराळा मतदार संघात सम्राट महाडिक यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. परंतु राज्यात अचानक घडलेल्या राजकीय घडामुळे राहूल महाडिकांनीही शडृडू ठोकला आहे. त्यामुळे शिराळा आणि इस्लामपूर मतदार संघ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



