rajkiyalive

samrat mahadik news :सम्राट महाडिकांची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता

samrat mahadik news : सम्राट महाडिकांची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता : विधान परिषदेतील सहा विद्यमान आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने विधान परिषदेच्या सहा जागा रिक्त झाल्या आहेत. यामध्ये भाजपच्या 4, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 1 अशा एकूण सहा आणि राज्यपाल कोट्यातील पाच अशा एकूण अकरा जागा रिक्त असल्याने इच्छुकांकडून ताकदीने लॉबिंग सुरू आहे. यामध्ये पेठचे सम्राट महाडिक यांची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे.

samrat mahadik news : सम्राट महाडिकांची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता

शिराळा मतदार संघातून भाजपकडून सम्राट महाडिक इच्छुक होते. गेल्या पाच वर्षापासून त्यांनी जोरदार तयारीही केली होती. त्यांना उमेदवारी मिळेल असे वाटत असतानाच अचानक सत्यजित देशमुखांना भाजपची उमेदवारी मिळाली. वरिष्ठांच्या आदेशाने कार्यकर्त्यांंची इच्छा असतानाही सम्राट महाडिकांनी पक्षासाठी थांबणे पसंत केले. केवळ ते थांबले नाहीत तर निवडणुकीत जोरदार काम करीत सत्यजित देशमुखांना निवडून आणण्यात मोलाचा वाटा उचलला. तसेच ते मुख्यमंत्री फडणवीसांचे विश्वासू आहेत. त्यामुळे त्यांना विधानपरिषदेवर संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूरचे प्रवीण दटके, आमश्या पाडवी, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे सदस्य होते. हे सर्व 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. ते आता विधानसभेत दाखल होणार आहेत. नियमानुसार एकावेळी एका व्यक्तीस दोन्ही सभागृहाचे सदस्य होता येत नाही. त्यामुळे 23 नोव्हेंबरपासून या सर्व आमदारांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभेतून निवडणूक जिंकले. तर भाजपचे गोपीचंद पडळकरांनी जत विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली. भाजपचे प्रवीण दटके यांनी नागपूर मध्य विधानसभेतून निवडणूक जिंकली. शिंदे गटाचे आमश्या पाडवी अक्कलकुवा मतदारसंघातून विजयी झाले. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली. तसेच भाजपचे रमेश कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत रमेश कराड यांनी विजय मिळवला.

विधानसभा निवडणुकीत सहा विधान परिषद सदस्य विजयी झाल्याने आणि राज्यपाल कोट्यातील आणखी पाच जागा अद्याप रिक्त आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये आधीच विधान परिषद सदस्य होण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण 9 विधान परिषद आमदार, तर एक राज्यसभा खासदार होते.

निवडणुकीच्या आधी सम्राट महाडिकांना देवेंद्र फडणवींसांनी मोठी बक्षीस देवू असी सांगितले होते. त्यामुळे फडणवीस आपला शब्द पाळतील असा कार्यकर्त्यांना विश्वास वाटत आहे. त्यामुळे यंदा सम्राट महाडिक आमदार होणार असे वातावरण तयार झाले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज