rajarambapu bank news : राजारामबापू सहकारी बँक देशातील प्रमुख २३ शेड्यूल्ड बँकेत : आपणा सर्वांच्या सहकार्याने राजारामबापू सहकारी बँक देशातील प्रमुख २३ शेड्यूल्ड बँकेत एक बनली आहे. आम्ही गेल्या ४४ वर्षापासून लोकनेते राजारामबापू पाटील यांचे आदर्श व माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली समाजातील विविध घटकांना आर्थिक ताकद देत आहोत, असा विश्वास राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील यांनी व्यक्त केला.
rajarambapu bank news : राजारामबापू सहकारी बँक देशातील प्रमुख २३ शेड्यूल्ड बँकेत
राजारामबापू सहकारी बँकेच्या साखराळे शाखेचा ४१ वा वर्धापनदिन व ग्राहक मेळाव्यात ते बोलत होते. राजारामबापू सह. बँकेचे संचालक धनाजी पाटील, सुभाषराव सुर्यवंशी,राजेश पाटील, व्यवस्थापकीय संचालक पी.एन.बाबर,माजी सभापती आनंदराव पाटील,राजारामबापू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.डी. माहुली,राजारामबापू सूत गिरणीचे उपाध्यक्ष सुहास पाटील,प्राचार्य पी.बी.कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकेनते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी साखराळे नूतन उपसरपंच सचिन पाटील, राज्यातील सर्वोत्कृष्ठ शेती अधिकारी पुरस्कार प्राप्त प्रशांत पाटील,राज्यातील सर्वोत्कृष्ठ चीफ इंजिनिअर पुरस्कार प्राप्त संताजी चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

प्रा.पाटील पुढे म्हणाले,लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी १९८१ साली बँकेची स्थापना केली
वाळवा तालुक्यातील शेतकरी व समाजातील विविध घटकांना आर्थिक ताकद देण्यासाठी बँकेची स्थापना केली आहे. आम्ही आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या ४८ शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना अद्यावत सोई-सुविधा देत आहोत. तत्पर सेवा व ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आहे. यावेळी कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांनी मार्गदर्शन केले.शाखेचे ग्राहक चंद्रशेखर पाटील (कोरेगाव),टी.एम.बाबर (तुजारपूर), सुधीर चिवटे (साखराळे), सौ.नजमुनिसा संदे (साखराळे) यांनी बँकेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
rajarambapu-bank-news-rajarambapu-sahakari-bank-among-the-top-23-scheduled-banks-in-the-country
याप्रसंगी नवेखेडचे माजी सरपंच प्रदीप चव्हाण,साखराळेचे माजी सरपंच बाबुराव पाटील,डॉ.प्रिती पाटील,कारखान्याचे सचिव डी.एम.पाटील,संतोष खटावकर,खातेदार सुरेश कदम,विजयराव पाटील,सयाजी कदम, कदम,संताजी गावडे,श्रीहरी पाटील,गुलाबराव पाटील,सतिश पाटील,विनायक यादव,बँकेचे जनरल मॅनेंजर श्रेणीक मगदूम,सूर्यकांत जाधव,मच्छिंद्र मोरे यांच्यासह सभासद व ग्राहक उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



