rajkiyalive

RAJARAMBAPU PATIL : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त रुग्ण वाहिकांचा लोकार्पण सोहळा

RAJARAMBAPU PATIL : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त रुग्ण वाहिकांचा लोकार्पण सोहळा :लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त गुरुवार दि.१ ऑगस्ट २०२४ रोजी इस्लामपूर,आष्टा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते रुग्ण वाहिकांचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.

RAJARAMBAPU PATIL : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त रुग्ण वाहिकांचा लोकार्पण सोहळा

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील, राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तसेच स्व.बापूंच्या जयंतीनिमित्त राजारामबापू साखर कारखान्यातील सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा,आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. सकाळी ७.३० वाजता कारखाना कार्यस्थळावर स्व.बापूंच्या पुतळ्याचे विधिवत पूजन केले जाणार आहे.

युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून राजारामबापू ज्ञान प्रबोधिनी संचालित जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियाना च्या माध्यमातून इस्लामपूर परिसरातील गावातील रुग्णांना इस्लामपूर बसस्थानकातून उपजिल्हा रुग्णालयात ने-आण करण्यासाठी मोफत रुग्ण वाहिकेची व्यवस्था केली आहे. तसेच आष्टा व परिसरातील गावातील रुग्णांच्या सेवेसाठीही मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली आहे.

इस्लामपूर बस स्थानकात सकाळी १० वाजता,तर आर्टस अँड कॉमर्स कॉलेजमध्ये दुपारी ४ वाजता रुग्ण वाहिका लोकार्पण सोहळा होणार आहे.

सकाळी ११.३० वा.सर्जेराव यादव मल्टिपर्पज हॉलमध्ये राजारामबापू साखर कारखान्यातील सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचा ‘स्नेह मेळावा व स्नेह भोजन’समारंभ होणार आहे. आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते, प्रतिकदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान केला जाणार आहे. त्यापूर्वी सकाळी ९ वा. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी होणार आहे.

राजारामनगर येथील आरआयटी कॉलेज मध्ये दरवर्षीप्रमाणे सकाळी ९ वा.रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे.

या शिबिरात साखर कारखान्यातील कर्मचारी,अधिकारी आरआयटी कॉलेजमधील शिक्षक,विद्यार्थी- विद्यार्थिनी,तसेच शिक्षण व उद्योग समूहातील अधिकारी-कर्मचारी रक्तदान करणार आहेत. तसेच कारखान्याच्या उर्वरित तिन्ही शाखेतही रक्तदान शिबिर आयोजित के

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज