इस्लामपूर ः प्रतिनिधी
RAJARAMBAPU SAKHAR KHARKHANA : यंदाच्या गळीत हंगामात इथेनॉल निर्मितीवर भर देणार ः प्रतिक पाटील : केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी उठविली असून या गळीत हंगामात सिरप व बी हेवी मोल्यासिसपासून इथेनॉल निर्मितीवर भर देणार असल्याची घोषणा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी केली. राजारामबापू इंडोमेन्ट ट्रस्टच्या माध्यमातून पूर्वीसारखी ऊस उत्पादक सभासदांना दुर्धर आजार तसेच आरआयटीत शिक्षण घेणार्या सभासदांच्या मुलामुलींना आर्थिक सहाय्य सुरु करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
RAJARAMBAPU SAKHAR KHARKHANA : यंदाच्या गळीत हंगामात इथेनॉल निर्मितीवर भर देणार ः प्रतिक पाटील
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 55 व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. माजी मंत्री आ. जयंतराव पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, राजारामबापू सह.बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, माजी आ.भगवानराव साळुंखे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली प्रामुख्याने उपस्थित होते.
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकर्यांशी संवाद करीत मार्गदर्शन केले. प्रतिक पाटील म्हणाले, आपण पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रातील पाहिला सौरऊर्जा प्रकल्प उभा केला आहे. त्यापासून विजेची मोठी बचत होणार आहे. टाकावू प्रेसमडपासून गॅस निर्मिती (सीबीजी)ही करणार आहोत. कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरुल युनिटची गाळप क्षमता वाढविण्याचा प्रयत्न आहे. देशात 320 लाख मेट्रीक टन साखरेची निर्मिती झाली असून देशात 290 लाख टन साखरेची मागणी आहे. उत्पादनापेक्षा मागणी कमी असल्याने साखरेस दर मिळण्यात अडचणी येत आहेत.
पी.आर.पाटील म्हणाले, केंद्र सरकारने प्रथम इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन दिले. मात्र त्यानंतर अचानक बंदी घातली. त्यामुळे साखर कारखान्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले, रुपयाचे अवमूल्यन हा देशातील सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. शेतकर्यांनी याचा अभ्यास करायला हवा. वाढलेल्या ऊस तोडणी आणि वाहतूक दराची झळ शेतकर्यांना बसत आहे. सरकारने शेतकर्यांना वर्षाला हजार देण्यापेक्षा निर्याती बंद्या उठविल्यास शेतकरी श्रीमंत होईल.
यावेळी रविंद्र पिसाळ, शंकर मोहिते, लक्ष्मण पाटील, बाजीराव पाटील यांच्यासह सभासद शेतकर्यांनी काही सूचना मांडल्या. अध्यक्ष प्रतिक पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांनी सभासदांचा प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. यावेळी शामराव वाटेगावकर, भीमराव पाटील, विजयराव यादव, शशिकांत पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, शहाजी पाटील, सुस्मिता जाधव, सुनिता देशमाने, रणजित पाटील, संग्राम फडतरे, सर्जेराव देशमुख, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, प्रदीपकुमार पाटील, सौ.मेघा पाटील, कामगार नेते शंकरराव भोसले यांच्यासह आजी-माजी संचालक, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सचिव डी.एम.पाटील यांनी श्रद्धांजली ठराव मांडून मागील इतिवृत्त वाचन केले. संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले. संचालक बाळासाहेब पवार यांनी आभार मानले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.