rajkiyalive

rajendra yadravkar news : यड्रावकरांना पुन्हा संधी देऊन विधानसभेत पाठवा :खासदार माने

rajendra yadravkar news : यड्रावकरांना पुन्हा संधी देऊन विधानसभेत पाठवा :खासदार माने: आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कागदावर विकास न दाखवता प्रत्यक्षात विकास करून आपले कार्यकुशल नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यांना या तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा संधी देवून विधानसभेत पाठवा. असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी सैनिक टाकळी (ता.शिरोळ) येथे झालेल्या सभेत केले.

rajendra yadravkar news : यड्रावकरांना पुन्हा संधी देऊन विधानसभेत पाठवा :खासदार माने

यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले, कुटुंब पद्धतीमुळे एकराची शेती आता गुंठ्यात वाटणी होऊ लागली आहे. त्यामुळे शेती उत्पन्न कमी होत असल्याने त्यांना नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी औद्योगिक वसाहत उभी राहत आहे. आजी-माजी सैनिकांसाठी मिलिटरी कॅन्टीन व्हावे यासाठी खासदार धैर्यशील माने आणि मी राज्य आणि केंद्र शासनाची पाठपुरावा करून जागा उपलब्ध करून आमदार विकास निधीतून त्या जागेवर कॅन्टीनचे बांधकाम ही करून देवू असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी बोलताना प्रमोद पाटील, संभाजी गोते, बाळासाहेब कोकणे, बबन यादव, प्रा. चंद्रकांत मोरे, हरिश्चंद्र पाटील, रणजितसिंह उर्फ बापू पाटील आदींची मनोगते झाली. याप्रसंगी कुशाल कांबळे, बाबासो वनकोरे, लक्ष्मण चौगुले, रावसाहेब कुंभोजे, विठ्ठल पाटील, राकेश खोंद्रे, नंदकुमार नाईक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन सागर बिरणगे यांनी केले.

फोटो ओळ
सैनिक टाकळी येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचार सभेत बोलताना खासदार धैर्यशील माने व्यासपीठावर मान्यवर.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज