rajkiyalive

rajendra yadravkar news : यड्रावकरांमुळे शिरोळमधील लाखाहून अधिक महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ

rajendra yadravkar news : यड्रावकरांमुळे शिरोळमधील लाखाहून अधिक महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ : लाडक्या बहिणींच्या शुभेच्छामुळे ही योजना सुपरहिट झाली. त्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशुळ उठले आहे. काही सावत्र भाऊ ही योजना बंद पडावी म्हणून कोर्टात गेले आहेत. पण हा एकनाथ शिंदे जेलमध्ये जाईल पण ही योजना कधीही बंद पडू देणार नाही. शिरोळ विधानसभेचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील 1 लाखाहून अधिक बहिणींना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. अशा भावाला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

rajendra yadravkar news : यड्रावकरांमुळे शिरोळमधील लाखाहून अधिक महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ

शिरोळ येथील टारे मल्टीपर्पज हॉल येथे महायुती व राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ लाडक्या बहिणींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी महिलांनी शिट्टी वाजवून मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, राज्य सरकारने महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवली आहेत. या योजनेला महिलांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, विरोधक ही योजना बंद करून सर्वांची चौकशी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र, लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे जेलमध्ये जाईल, पण ही योजना बंद होवू देणार नाही.
महायुतीचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर असा कार्यकर्ता आहे, तो कसा पण उभा राहिला तर निवडून येतो. 20 तारखेला लाडक्या बहिणींनी आपल्या भावासाठी मतदान करावे जेणेकरून समोरच्याची डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असा टोलाही त्यांनी लगावला.

स्वागत व प्रास्ताविक वर्षा पाटील यांनी केले. यावेळी हेरवाडच्या सरपंच रेखा जाधव यांनी आपल्या मनोगतातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महिलांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती देऊन आमदार यड्रावकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार केला.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पराग पाटील, वतन पठाण, संकेत मगदूम यांनी आपल्या समर्थकांसह तर छत्रपती ग्रुपचे प्रमुख प्रमोद दादा पाटील निमशिरगावच्या राजश्री कोगले, महेश कोगले यांनी आपल्या समर्थक आमदार राजेंद्र पाटील यांना पाठिंबा दिला.

खासदार धैर्यशील माने, मयूर उद्योग समूहाचे संजयदादा पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने, भाजपाचे नेते रामचंद्र डांगे, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, सतीश मलमे, सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर, माधुरी टाकारे, सुशांत पाटील, मुकुंद गावडे, उदय झुटाळ, रणजीतसिंह पाटील, सुरेश शहापुरे, भालचंद्र कागले, प्रकाश पाटील टाकवडेकर, विद्याधर कुलकर्णी, जयपाल कुंभोजे, जिल्हा संघटिका छायाताई सूर्यवंशी, महिला आघाडी तालुका प्रमुख स्मिता निकम, अर्चना भोजने, अस्मा पटेल, धनगोंडा पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चंद्रकांत मोरे, दीपा चंदुगडे, राजेंद्र दाइंगडे, सुनील ताडे, रमेश यळगुळकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य लाडक्या बहिणी उपस्थित होत्या.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज