rajkiyalive

RAJU SHEETI : शक्तीपीठ महामार्गावरील जमिनी लुटण्याचे सरकारचे कारस्थान हाणून पाडू

पुणे (प्रतिनिधी)-

RAJU SHEETI : शक्तीपीठ महामार्गावरील जमिनी लुटण्याचे सरकारचे कारस्थान हाणून पाडू :  राज्यात भीषण दुष्काळाची स्थिती असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली. ते पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांची आज भेट घेऊन दुष्काळाच्या तीव्रतेची परिस्थिती दाहकता समोर मांडून यावर ठोस उपाययोजना करण्याची त्यांनी मागणी केली. तसेच शक्तीपीठ महामार्गावरील जमिनी लुटण्याचे सरकारचे कारस्थान आम्ही हाणून पाडू, हा महामार्ग तातडीने मागे घ्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला.

RAJU SHEETI : शक्तीपीठ महामार्गावरील जमिनी लुटण्याचे सरकारचे कारस्थान हाणून पाडू

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, यंदा राज्यात अत्यंत भीषण दुष्काळ परिस्थिती असताना देखील राज्य सरकार द्वारे कोणत्याही ठोस उपाय योजना करताना दिसत नसून दुष्काळा मुळे राज्यातील शेतकरी पुर्णपणे होरपळून गेली आहे. आचारसंहितेचा बागुलबुवा दाखवून प्रशासाने उपाययोजना करण्यास टाळाटाळ करत आहे. जनावरे पाण्याविना तडफडत आहे.

पीक कर्ज वाटप नियोजन प्रश्नी प्रशासन उदासिन दिसत आहे

राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र सह इतर बहुतांश जिल्ह्यात चारा पाण्याची कमतरता होत असतांना देखील यंदा राज्य सरकारद्वारे एकही चारा छावणी उभी केली नाही. एका बाजूला दुष्काळाने घेरले असताना काही भागात अवकाळीमुळे उरली सुरली हाताशी आलेली पिके, फळे, बागा उद्ध्वस्त झालेली असल्याने याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसला आहे. राज्यात खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना पीक कर्ज वाटप नियोजन प्रश्नी प्रशासन उदासिन दिसत आहे

तसेच पाण्याचे योग्य नियोजन न राखल्याने ग्रामीण भागात गावोगावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला असून ग्रामीण जनजीवन अक्षरशः पूर्ण उध्वस्त होण्याच्या अवस्थेत असताना सरकार कडून अत्यंत तुटपुंजी उपाययोजना केली जात आहे. दुष्काळमुळे राज्यातील शेतकरी पार मेटाकुटीला आलेला असून त्याच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना कर्ज वसुलीसाठी बँका वित्त पुरवठादार संस्था तगादा लावत आहे.

राज्यात त्वरीत दुष्काळ जाहीर करत सर्व प्रथम शेतकर्‍याकडून करण्यात येणार्‍या पीक कर्ज वसुलीस ताबडतोब स्थगिती देत ज्या ज्या महसूल क्षेत्रात दुष्काळ तीव्रता सर्वाधिक आहे त्या ठिकाणी पीक कर्ज माफी घोषीत करावी लागणार आहे. अवकाळीग्रस्त नुकसान भरपाई झालेल्या सर्व शेतकर्‍यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देऊन राज्यात अद्यापही शासनाद्वारे चारा छावण्या सुरु करण्यात आलेल्या नाहीत, मागणी येईल त्या गावात विना विलंब चारा छावणी सुरु करण्यात यावेत. पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरुप धारण करत असल्याने ज्या ज्या गावांत मागणी येईल त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टैंकर त्वरीत उपलब्ध करुन मिळण्यासाठी सरकारने तातडीने लक्ष घालावे. अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज