rajkiyalive

RAJU SHETTI : ‘महायुती अन् महाविकास’च्या कात्रीत राजू शेट्टी

RAJU SHETTI : ‘महायुती अन् महाविकास’च्या कात्रीत राजू शेट्टी : काँग्रेसकडून इंडिया आघाडीतील प्रवेशाचा मुहुर्त, तर भाजप नेत्यांचा संपर्काने स्वाभिमानीचे कार्यकर्ते संभ्रमात

 

 

RAJU SHETTI : ‘महायुती अन् महाविकास’च्या कात्रीत राजू शेट्टी

जनप्रवास । अनिल कदम

RAJU SHETTI : ‘महायुती अन् महाविकास’च्या कात्रीत राजू शेट्टी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार वरून वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. चार महिन्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतली आणि कामाला लागले. मतदारसंघ पिंजून काढत असतानाच अचानक महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सर्वांनाच धक्का दिला. त्यानंतर शेट्टी महाविकास आघाडीकडून लढण्याच्या चर्चेला उत आला. काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील यांनीही शेट्टींचा इंडिया आघाडीतील मुहूर्त लवकरच ठरणार असल्याचे जाहीर केले. शेट्टीच्या भूमिकेची रिअ‍ॅक्शन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये उमटली. शेट्टीवरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाल्यानंतर भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने शेट्टींना महायुतीकडून लढण्याचे निमंत्रण दिले. मंत्री अब्दुल सत्तार यांनी हातकणंगलेची जागा शिवसेना लढवणार असल्याचे पुन्हा जाहीर केले. त्यामुळे शेट्टी महायुती आणि महाविकास आघाडीच्या कात्रीत सापडल्याचे दिसते.

लोकसभा निवडणूक असल्याने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.

या परिस्थितीत साखर कारखान्यांचा हंगामही सुरु झाला आहे. ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसून कारखानदारांना लक्ष करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात वणवा पेटल्यानंतर सांगली जिल्ह्यातही ऊस आंदोलन सुरु झाले. गाड्यांची अडवाअडवी, टायरी फोडण्यासह थेट कारखान्यांवर जावून निदर्शनेही झाली. स्वाभिमानीने तब्बल 38 दिवस आंदोलन करीत सरकारसह साखर कारखानदारांना दखल घेण्यास भाग पाडले. आंदोलनाच्या निमित्ताने स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टींकडून ऊस दराची लढाई करीत असले तरी लोकसभेची पेरणी सुरु असल्याचे स्पष्ट झाले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पिंजून काढत असताना शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे शेट्टींचा कल महाविकास आघाडीकडे असल्याची चर्चा रंगली. महाविकासचे उमेदवार शेट्टीच होणार असल्याचे स्पष्ट होताच सेनेत नाराजी उफाळून आली.

 

जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी शेट्टींना विरोध केल्याने त्यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली.

त्यामुळे इंडिया आघाडीची नेमकी भूमिका काय? याची कल्पना कार्यकर्त्यांना आली आहे. नुकत्याच झालेल्या इंडिया आघाडीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळतील, असे विधान हसन मुश्रीफ यांनी केले, तर अब्दुल सत्तार हातकणंगलेची जागा ही शिवसेनेकडेच राहील, असे पुण्यातून कडाडले. तर विद्यमान खासदारांचे अजूनही असेलेल्या मौनामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण, यावरून सुंदोपसुंदी सुरू असल्याचे दिसते.

एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना इंडिया आघाडीसोबत यावी यासाठी जिल्हासह महाराष्ट्रातील बड्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

काँग्रेसचे माजी मंत्री व आ. सतेज पाटील यांनी काही दिवसात चित्र स्पष्ट होईल, असे विधान केले असताना इंडिया आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना घेण्यास विरोध वाढू लागला आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात इंडिया आघाडीतील घटक पक्षाचा हक्काचा उमदेवार द्यावा. हातकणंगले लोकसभेची जागा शिवसेनेकडे असली तरी इंडिया आघाडीकडून जो उमेदवार देण्यात येईल, त्याच्या पाठीशी एकत्रितपणे राहण्याची ग्वाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी बैठक घेवून दिली.

 

हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभेच्या दोन जागेवरून भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे.

दोन्हीपैकी एक मतदारसंघ घेण्यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही एका मतदारसंघात कमळाच्या चिन्हावर लढण्यासाठी पक्ष आणि वरिष्ठ आग्रही आहेत. सद्यःस्थितीत भाजपच्या सर्व्हेत शिवसेना शिंदे गटाचे प्रा. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे दोन्ही विद्यमान खासदार धोक्यात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या ठिकाणी आहे तेच राहणार की? कमळाच्या चिन्हावर विद्यमान निवडणुकीच्या रिंगणात उतरणार किंवा उमेदवार बदलणार हे कळायला मार्ग नाही. पण भाजपकडून हातकणंगलेतून राहुल आवाडे आणि सुरेश हाळवणकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. या परिस्थितीत भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने शेट्टींना महायुतीकडून लढण्याचे निमंत्रण दिले आहे, परंतु ते नाव अद्यापही गुलदस्त्यांत आहे.

शेट्टींनी 2019 ची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत लढवली होती.

काँग्रेसचे काही नेते शेट्टींना सोबत घेण्यासाठी सकारात्मक असली तरी राष्ट्रवादीचा विरोध राहण्याची चिन्हे आहेत. शेट्टींनी यावेळी प्रथमच ऊस दरासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या साखराळे येथील राजारामबापू कारखान्यावर जावून आंदोलन करीत डिवचले. गतवेळी इस्लामपूर आणि शिराळा तालुक्यातील राष्ट्रवादीने शेट्टींचे प्रामाणिक काम केले होते. परंतु जयंत पाटील यांना टार्गेट केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही नाराज आहेत. त्यामुळे जयंतराव हे शेट्टींना मनापासून मदत करतील हे सांगता येत नाही.

 

 

हेही वाचा
SWABHIMANI SHETKRI SANGTNA : स्वाभिमानीचा ‘एक व्होट-एक नोट’चा नारा

RAJU SHETTI : राजू शेट्टी मातोश्रीवर

(raju shetti ) आंदोलन योग्य पण दिशा भरकटली…

लोकसभेसाठी शेट्टींची मशागत सुरू

आवाडेंशी दुश्मनी शेेट्टींच्या मुळावर

शेतकरी संघटना, अभावग्रस्तांचा प्रभाव

शेतकरी संघटनांना फुटीचा शाप

हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच

ऐनवेळच्या पैलवानांना लोकसभेचे स्वप्न...

RAJU SHETTI : भाजप नेत्यांबरोबर अद्याप चर्चाच नाही : शेट्टी

स्वाभिमानीचे नेते शेट्टी यांच्या इंडिया आघाडीतील सहभागाबाबतचा काँग्रेस नेते मुहुर्त सांगत आहेत. तर महायुतीकडून शेट्टींना ऑफर दिली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कात्रीत शेट्टी सापडल्याचे दिसत आहे. मात्र या राजकीय गोंधळात स्वाभिमानीचे कार्यकर्तेही गोंधळले असल्याचे चित्र दिसून येते.

भाजपमधून राहुल आवाडेंचे नाव पुढे

हातकणंगलेतून भाजपकडून राहुल आवाडे यांचे नाव पुढे येत आहे. आवाडे यांना उमेदवारीचे संकेत मिळाल्याने राममंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे निमित्त साधून भव्य मिरवणूक, साडी व कुर्ता, तसेच राममूर्ती वाटप अशा जंगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याशिवाय मतदारसंघातील प्रत्येक गावात आणि चौका-चौकात आवाडेंचे फलक लावण्यात येणार आहेत. या मतदारसंघात आवाडे गटाची चांगली ताकद आहे. सहकारी संस्थांमुळे यंत्रणा मोठी आहे. यामुळे ते राजू शेट्टी यांना चांगली लढत देऊ शकतील, असे भाजपच्या नेत्यांना वाटते. याशिवाय भाजपतर्फे लोकसभा लढण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर इच्छुक असल्याचीही चर्चा आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज