rajkiyalive

raju shetti news : राजू शेट्टींच्या त्या तक्रारीनंतर न्यायपालिकेकडून तातडीने सुनावणी

raju shetti news : राजू शेट्टींच्या त्या तक्रारीनंतर न्यायपालिकेकडून तातडीने सुनावणी : ज्या न्यायाधीश यांच्याकडे मी याचिका दाखल केली आहे त्यांना गेल्या दोन वर्षात याबाबत निर्णय घेण्यास वेळ मिळाला नसेल ? खरच जर या प्रकरणाबाबत संबधित न्यायाधीश यांना गांभीर्य नसेल तर त्यांना देण्यात येणारा पगार तीन टप्यात द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचेकडे केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या न्यायव्यस्थेकडून राजू शेट्टी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

raju shetti news : राजू शेट्टींच्या त्या तक्रारीनंतर न्यायपालिकेकडून तातडीने सुनावणी

राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या अधिकारावर गदा आणण्याचे काम राज्य सरकारकडून करण्यात आले असून एक रक्कमी एफ. आर. पी च्या कायद्यात बदल करण्याचे अधिकार हे केंद्र सरकारला आहेत. मात्र राज्य सरकारने अधिकाराचा गैरवापर करून एफ. आर. पी मध्ये बदल करत तीन टप्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात राजू शेट्टी यांनी रिट पेटीशन क्रमांक 5736 / 2022 अन्वये – राज्य सरकारच्या विरोधात याचिका दाखल केली होती.

चालू गळीत हंगामात राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांचे जवळपास 1500 कोटी रूपयापेक्षा जास्त रक्कम थकीत आहे. साखर कारखानदाराकडून एक रक्कमी एफ. आर. पी मध्ये बेकायदेशीर केलेल्या कायद्याचा आधार घेऊन दोन किंवा तीन टप्यात एफ. आर. पी अदा करू लागले आहेत. अनेक साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होवून जवळपास दोन महिने झाले तरीही ऊस बिले अदा करण्यात आलेली नाहीत. यामुळे येत्या सोमवारी होणा-या सुनावणीकडे संपुर्ण राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या नजरा लागल्या आहेत.

राजू शेट्टी यांनी केलेल्या तक्रारीनंतर मा.मुख्य न्यायमुर्ती यांचेकडून उच्च न्यायालयाच्या रजिस्टर यांना सदर प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्याचे न्यायालयाचे असिस्टंट रजिस्टर यांनी राजू शेट्टी सांगितले. यामुळे येत्या सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात राजू शेट्टी स्वत: या सुनावणीसाठी हजर राहणार असून राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्यावतीने ड. योगेश पांडे हे सदर याचिकेचे कामकाज पाहणार आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज