rajkiyalive

raju shetti news : रेखांकन बदलून यड्रावकरांनी 11 गावातील शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळले : राजू शेट्टी

raju shetti news : रेखांकन बदलून यड्रावकरांनी 11 गावातील शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळले : राजू शेट्टी : रत्नागिरी – नागपूर महामार्गातील अंकली ते चोकाक या मार्गातील जमिनींना चौपट मोबदला मिळावा या मागणीसाठी गेल्या दीड वर्षापासून शेतकरी लढा देत आहेत. काल झालेले आंदोलन हे राजकीय असल्याची प्रतिक्रिया शिरोळ विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी देवून स्वत:चे अपयश लपविण्यासाठी 11 गावातील शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.

raju shetti news : रेखांकन बदलून यड्रावकरांनी 11 गावातील शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळले : राजू शेट्टी

शेट्टी पुढे म्हणाले की, काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने अंकली टोलनाका येथे चौपट मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाच्या आदल्या दिवशी रात्रीपासूनच स्वाभिमानीच्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. तरीही परिसरातील शेतकरी व महिला यांचेवतीने रास्ता रोको करण्यात आले.

या आंदोलनाबाबत शिरोळ विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले कि, आम्ही शेतकर्‍यांच्या बाजुने आहोत. या महामार्गात माझीही जमीन जात असल्याने आम्ही विरोध करत आहोत. आजपर्यंत राष्ट्रीय महामार्गाकडून याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. आठ दिवसापूर्वी मुख्यमंत्री यांना भेटून तोडगा काढण्याचे निवेदन दिले असल्याचे सांगितले.

सोमवार व मंगळवारी उदगांव व उमळवाड गावातील जमिनी मोजणी करण्याची नोटीसा शेतकर्‍यांना देण्यात आल्या आहेत.

याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले कि वास्तिवक पाहता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रेखांकन करून, प्रकल्प अहवाल तयार करून, रस्त्याची निवीदा प्रक्रिया करण्यात आली आहे. अतिग्रे, चोकाक, हातकंणगले, माणगावेवाडी या गावांची मोजणी पूर्ण करण्यात आली आहे. सोमवार व मंगळवारी उदगांव व उमळवाड गावातील जमिनी मोजणी करण्याची नोटीसा शेतकर्‍यांना देण्यात आल्या आहेत. यामुळे संतप्त होवून शेतकरी उपोषणास बसले आहेत.

raju-shetti-news-by-changing-the-drawing-yadravkar-rubbed-salt-in-the-wounds-of-farmers-in-11-villages-raju-shetti

जर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मोजणी पूर्ण झाली तर 1956 च्या भुसंपादन कायद्यानुसार सक्तीने भूसंपादन करून महामार्गाच्या कामास सुरवात होणार आहे. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी या मोजणीस विरोध करत आजचे आंदोलन केले आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपट मोबदल्यात राजेंद्र पाटील यड्रावकरांनी फसवणूक केली आहे. स्वत:च्या फायद्यासाठी महापुराचा विचार न करता सुरवातीस रेखांकन बदलून घेऊन जैनापूर गावास बायपास दाखवित स्वत:च्या कॉलेज जवळून पुढे कोथळी व उमळवाड लक्ष्मीनगर जवळून मार्ग काढला होता.

जैनापूर गावास बायपास करण्यात आलेले रेखांकन पुन्हा बदलून पुर्वीप्रमाणे केले

यानंतर 14 जानेवारी 2022 रोजीच्या नवीन कायद्याप्रमाणे दुप्पट नुकसान भरपाई मिळणार हे लक्षात आल्यावर 11 जानेवारी 2022 रोजी जैनापूर गावास बायपास करण्यात आलेले रेखांकन पुन्हा बदलून पुर्वीप्रमाणे केले व उदगांव, उमळवाड येथील शेतकर्‍यांचे रेखांकन कायम ठेवून परिसरातील उमळवाड, उदगाव, कोथळी, सांगली शहर, धामणी, समडोळी, कवठेपिराण, सांगलवाडी, हरिपूर, दानोळी, कवठेसार, हिंगणगांव, कुंभोज, दुधगांव, सावळवाडी, माळवाडी, किणी ते खोची या भागातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले आहे. स्वत:चा फायदा बघणार्‍या यड्रावकर यांना जर खरच शेतकर्‍यांची काळजी होती तर रेखांकन , प्रकल्प अहवाल, निविदा प्रक्रिया व चार गावातील मोजण्या पूर्ण होईपर्यंत मुग गिळून का गप्प बसले होते याचे उत्तर द्यावे. असे हे राजू शेट्टी म्हणाले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज