rajkiyalive

raju shetti news : राज्यात 1 जुलैपासून कर्जमुक्ती आंदोलन : राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय

 

जयसिंगपूर/ प्रतिनिधी

raju shetti news : राज्यात 1 जुलैपासून कर्जमुक्ती आंदोलन : राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय शेतकर्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्यात 1 जुलै पासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. पुसद जि. यवतमाळ येथून या आंदोलनाची सुरूवात करणार आहे. शेतकर्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारला गुडगे टेकायला भाग पाडू, असा इशारा देखील शेट्टी यांनी दिला.

raju shetti news : राज्यात 1 जुलैपासून कर्जमुक्ती आंदोलन : राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय

बारामती येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या समारोप बैठकीत शेट्टी बोलत होते. यावेळी संघटनेची नव्याने बांधणी करून राज्यभर दौरे करू असेह सांगून ते म्हणाले की, राज्य सरकारने शेतकर्‍यांवर वरवंटा फिरवू नये. तातडीने एफआरपी व भूमिअधिग्रहण कायद्यातील केलेली दुरूस्ती मागे घ्यावी. दूध उत्पादकांची लूट सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर कमी होऊ लागले आहेत. राज्य सरकारने तातडीने दूध उत्पादक शेतकर्यांना प्रतिलिटर 7 रूपये अनुदान खात्यावर वर्ग करावे, अन्यथा 10 जुलै रोजी 1 दिवसाचे दूध बंद आंदोलन करू.

शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. महायुती व महाविकास आघाडीचे शेतकर्यांवरील प्रेम हे निवडणुकीपुरतेच होते. निवडणुका संपल्या व त्यांची गरज संपली. त्यांनी पुन्हा शेतकर्यांना वार्यावर सोडले आहे. शेतकर्यांची कर्जमुक्ती झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. 1 जुलै पासून मी राज्यव्यापी दौरा काढून पुन्हा नव्याने आंदोलन सुरू करत आहे. शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांची लग्ने होताना अडचणी येत आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे लग्ने होत नाहीत. त्यासाठी सरकारने 5 लाख रूपये स्त्रीधन म्हणून द्यावे. तसेच नवविवाहित जोडप्यांना स्वंयरोजगारासाठी 25 लाख रूपयांचे कर्ज वाटप करावे, अशी आमची मागणी आहे.

महाविकास आघाडीने निवडणुकीत यश मिळाले म्हणून हुरळून जाऊ नये. भावनेच्या लाटेवर स्वार होऊन निवडणुकीत मिळालेले यश अल्पकाळ असते. यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न मिटले नाहीत. प्रश्न जैशे थेच आहेत. गद्दार व निष्ठावतांच्या लढाईत शेतकरी गुदमरला आहे. थकीत वीज बिलासाठी एकही कनेक्शन कट करू नये, बोगस वीज बिले आमच्या माथी मारू नयेत. अव्वाच्या सव्वा दराने वीज आकारणी करून जादाची वीज बिले कृषीपंपाची दिली आहेत. आम्ही काय गुन्हेगार नाही. शेतीची वीजबिले माफ करावीत. 10 पट पाणी वाढीचा निर्णय तातडीने रद्द करून जलसंपदा नियमन लागू केलेला मागे घ्यावा.

शेतकरी कधी पाण्याची उधळपट्टी करत नाही. आम्ही जे काही ठराव केले आहेत ते सरकारपर्यंंत पोहचवू, सरकारने आमचे म्हणणे ऐकले तर ठीक नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील शेट्टी यांनी दिला. स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील म्हणाले की, निवडणुका आम्ही स्वबळावर लढलो. आम्ही स्वस्थ बसणार नाही. पुन्हा उठू व लढू.

यावेळी सतिश काकडे, संदीप जगताप, प्रकाश पोपळे, राजेंद्र गड्ड्यान्नावर, प्रकाश बालवाडकर, अनिल पवार, अमर कदम, दामोदर इंगोले, किशोर ढगे, प्रशांत डिक्कर, प्रभाकर बांगर, जनार्दन पाटील, पोपट मोेरे, बापू कारंडे, संदीप राजोबा, महेश डुके आदी उपस्थित होते.

फोटो ओळ
बारामती येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या समारोप बैठकीत बोलताना राजू शेट्टी

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज