rajkiyalive

raju shetti news : वेगवेगळ्या भूमिकेने राजू शेट्टींच्या विचाराला घरघर

दिनेशकुमार ऐतवडे

स्वाभिमानी शेतकरी संघटना
शाहूवाडीत शिवसेनाला
तासगावात राष्ट्रवादीला
शिराळ्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला
सांगलीत अपक्षला
इस्लामपुरात महायुतीला
पाठिंबा

raju shetti news : वेगवेगळ्या भूमिकेने राजू शेट्टींच्या विचाराला घरघर

हातकणंगले लोकसभा मतदार संघांचे माजी खासदार राजू शेट्टी यांचे सध्या राजकारणातील विविध भूमिका चर्चेचा विषय ठरली आहेत. लोकसभेला पराभूत झाल्यानंतर स्वतंत्र भूमिका घेवून सत्ताधार्‍यांविरोधात लढण्याची घोषणा केली. मात्र सध्याच्या राजकारणात त्यांचा विविध पक्षांना दिलेला पाठिंबा आश्चर्य वाटण्यासारखा आहे.
20 वर्षापूर्वी शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेतून फारकत घेवून त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली. तेंव्हा त्यांच्यासोबत सदाभाउ खोत, जालिंद पाटील, सावकार मादनाईक, वैभव कांबळे, रविकांत तुपकर हे हाडाचे कार्यकर्ते होते. आज हे सर्वजण त्यांना सोडून गेले आहेत. राजू शेटृी यांनी एकदा आमदारकरी आणि दोनदा खासदारकी भोगली. संघटनेत ज्यावेळी राजकारण नव्हते तेंव्हा सर्व काही आलबेल होते. परंतु सदाभाउ खोत यांना आमदारकी आणि मंत्रीपद मिळाले आणि सर्वांना पदाचा मोह सुटला.

स्वाभिमानीचे उल्हास पाटील बाहेर पडून आमदार झाले. सदाभाउ बाहेर पडून पुन्हा आमदार झाले. तुपकड बाहेर पडले. संघटनेच्या वाट्याला मात्र सतत अपयश येत गेले. दोन वेळा खासदार राहिलेल्या राजू शेट्टींना दोन वेळा खासदारकी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे कार्यकर्ते आणखीनच नाराज झाले.
विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांना समान अंतरावर ठेवून तिसरी आघाडी निर्माण करून आव्हान निर्माण करू असे सांगितले. परंतु त्यांचे ते आव्हान फार दिवस टिकले नाही. प्रत्येक मतदार संघात कोणाला तरी पाठिंबा देत ते सुटले आहेत. शाहूवाडी मतदार संघात त्यांनी त्यांचे लोकसभेतील विरोधक उबाठाचे सत्यजित पाटील यांना पाठिंबा दिला.

शिराळा मतदार संघात त्यांचे कार्यकर्ते शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे मानसिंगराव नाईक यांच्या प्रचारात आघाडीवर असल्याचे दिसत आहेत. तासगावमध्ये त्यांनी शरद पवार पक्षाचे रोहित पाटील यांना पाठिंबा दिला आहे. इस्लामपूरमध्ये त्यांनी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा दिला आहे. शिरोळमध्ये त्यांनी स्वताच्या पक्षाचे उमेदवार दिले आहे.

त्यांच्या या भूमिकेने त्यांच्याच पक्षातले कार्यकर्ते नाराज झाले असून, सावकार मादनाईक यांनीही संघटनेला सोडचिठठी दिली. एकंदरीत एका विचारधारेवर चालणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता राजकारणासाठी वेगवेगळ्या मतदार संघात वेगवेगळ्या भूमिका घेताना दिसत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज