raju shetti news : ऊसतोड मजूर मुंढे महामंडळाकडून पुरवावेत : राज्यातील साखर कारखाने व खाजगी कारखान्याची ऊस तोडणी वाहतूकदार व मुकदम मजुरांची करार ऑनलाइन करण्यासह गोपीनाथ मुंडे महामंडळाने नोंदणी असलेले मजूर पुरविण्यात यावेत, अशी मागणी स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेने साखर आयुक्तांकडे मंगळवारी केली.
raju shetti news : ऊसतोड मजूर मुंढे महामंडळाकडून पुरवावेत
साखर आयुक्तांकडे स्वाभिमानी ऊसतोड वाहतूक संघटनेची मागणी
पुणे येथे साखर आयुक्तालयामध्ये साखर आयुक्त सिद्धाराम सलीमठ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा व सुकाणू समितीतील सदस्यांनी काही सूचना केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऊस तोडणी मुकदम व मजूर यांचेकडून ऊस वाहतूक करणार्या वाहतूकदार शेतकर्यांची फसवणूक टाळण्यासाठी कायदा करणे तसेच साखर कारखानदार व उस तोडणी वाहतूकदार शेतकरी यांच्या करारात दुरुस्ती यासाठी साखर आयुक्तांना बैठक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
1 शेतकर्याला पीक कर्ज ई करार पद्धतीने देतो त्याप्रमाणे महामंडळाने मजूर मुकदमांच्या मालमत्तेवर ई करार करून त्यांच्यामार्फत देण्यात यावा. ती रक्कम ऊस वाहतूकदार शेतकरी महामंडळाकडे वर्ग करेल.
2 त्रिसूत्री पद्धतीचा म्हणजे ऊस वाहतूकदार शेतकरी व मुकदम मजूर तसेच कारखान्याचा शेती विभाग कारण शेती विभागाचे व्हेरिफिकेशन व शिफारस झाल्याशिवाय अग्रीम रक्कम मुकदम व मजुरांना दिली जात नाही. सदरचा करार हा रजिस्टर समोर व्हावा व त्याची स्टॅम्प ड्युटी माप करण्यात यावी.
3 यापूर्वी ज्या कारखान्यामध्ये व ऊस वाहतूकदार शेतकर्याकडे काम केलेले आहे त्याची एनओसी तसेच सध्या त्याच्या नवीन करारामध्ये कोणकोणत्या कारखान्याकडे किती टोळ्या आहेत व त्यात असणारे मजूर हे प्रत्येक कारखान्याला वेगवेगळे आहेत, हे सुद्धा नमूद असणे गरजेचे आहे.
4) यातूनही जर एखाद्या मुकादमाने फसवणूक करून तो इतर कारखान्याकडे काम करत असल्याचे निदर्शनास आलेस पहिल्या ऊस तोडणी वाहतूक शेतकर्याच्या वसुलीस अग्रक्रम देण्यात यावा.
5) जर मुकदम व मजुराने फसवणूक केलीच तर सदरचा गुन्हा प्रिझम्शन म्हणजेच गृहीतके फसवण्याच्या उद्देशानेच अग्रीम रक्कम घेतलेली आहे त्यामुळे सदरचा गुन्हा हा दिवाने बाब न समजता फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा कारण सदरचा व्यवसाय हा चार महिन्यापर्यंत असतो व प्रत्येक वेळी मुकदम मजुरांची अदलाबदल होत असते तसेच 50
टक्के रक्कम भरल्याशिवाय म्हणजेच ग्रँड ऑफ बिल ऑन डिपॉझिट फिफ्टी पर्सेंट अमाऊंट ऑफ मिस अप्रोप्रिएशन और चीटिंग अंतर्गत भरून घेऊनच त्याला जामीन मिळावा तसेच सीआरपीसी कायद्यामध्ये राज्य सरकारने प्रोसीजरली लॉ आहे त्याप्रमाणे दुरुस्ती करावी.
6) ऊस तोडणी वाहतूकदार शेतकरी हा एक प्रकारे लघु उद्योजकच आहे त्यामुळे ज्याप्रमाणे साखर कारखान्यांच्या किंवा उद्योगपतींच्या कर्जांना सरकार हमी देते त्याप्रमाणे या कर्जाला सुद्धा सरकारने हमी द्यावी, यापूर्वी फसवणूक झालेल्या ऊस तोडणी वाहतूकदार शेतकर्याची सत्यता पडताळून त्याला कर्जमाफी देण्यात यावी तसेच पूर्वी फसवणूक झालेल्या ऊस तोडणी वाहतूकदारांचे गुन्हे नोंदवण्यास पोलिस टाळाटाळ करत आहे काही ठिकाणी 0 नंबर ने गुन्हे नोंदवले जात आहेत तरी ऊस तोडणी वाहतूकदार शेतकरी हा ज्या पोलीस स्टेशनच्या हाद्दिच्या अंतर्गत येतो त्याच ठिकाणी त्याचा गुन्हा नोंदवण्याविषयी तात्काळ सूचना व्हाव्यात.
raju-shetti-news-sugarcane-cutting-laborers-should-be-provided-by-mundhe-corporation
7) ऊस तोडणी वेळी एखाद्या मजुराचा मृत्यू झाल्यास कारखान्याने विमा उतरवला असल्यास त्याला विम्याची रक्कम मिळते परंतु ज्या ऊस तोडणी वाहतूकदार शेतकर्याने त्याला अग्रीम रक्कम दिलेली असते ती बुडते त्यामुळे ऊस तोडणी वाहतूकदार शेतकर्याने साखर कारखाना,बँक, पतसंस्था यांच्याकडून घेतलेल्या कर्जा ला विमा संरक्षण देऊन त्यातून वसुली करण्यात यावी.
8) तसेच बांधकाम कामगार महामंडळ जय प्रमाणे सोई सुविधा दिल्या जातात त्याच प्रमाणे गोपीनाथ मुंडे महामंडळालादेण्यात याव्यात याचा लाभ खुरपे तोड करणार्या मजुरांना, ऊस तोडणी वाहतूकदार शेतकार्यांना सुद्धा देण्यात याव्यात.
9)सध्या कार्यरत असणार्या गोपीनाथ मुंडे महामंडळामध्ये ऊस तोडणी वाहतूकदार शेतकरी व उस उत्पादक शेतकरी प्रतिनिधींची नियुक्ती किंवा ऊस तोडणी वाहतूकदारांच्यासाठी स्वतंत्र नवीन ऊस तोडणी वाहतूक महामंडळाची निर्मिती व्हावी.
10) साखर आयुक्त साहेब आपण यासाठी नवीन पची निर्मिती करणे गरजेचे असून प्रत्येक साखर कारखान्याने मुकदम व मजुरांशी झालेला करार हा त्यांच्या नावानिशी एप्लीकेशन मध्ये प्रसिद्ध करावा.
यावेळी राज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ साहेब तसेच विस्मा चे अजित चौगुले गोपीनाथ मुंडे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भरत केंद्रे अप्पर कामगार आयुक्त अभय गीते साहेब जॉईन डायरेक्टर महेश झेंडे साहेब सहाय्यक संचालक सचिन बराटे साहेब रावसो अबदान राजगोंडा पाटील तानाजी पाटील विनोद पाटील प्रवीण शेट्टी विद्यासागर पाटील तसेच इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.