rajkiyalive

raju shetti on almatti : अलमट्टीची उंची रोखण्यात राज्यातील नेत्यांत दम नाही ः राजू शेट्टी

raju shetti on almatti : अलमट्टीची उंची रोखण्यात राज्यातील नेत्यांत दम नाही ः राजू शेट्टी : कर्नाटकमधील अलमट्टी धरणाची उंची रोखण्यात राज्यातील नेत्यांमध्ये दम नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. शक्तिपीठ आणि पूरबाधित शेतकर्‍यांना सोबत घेवून 12 मार्चला मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे, या मोर्चात शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

raju shetti on almatti : अलमट्टीची उंची रोखण्यात राज्यातील नेत्यांत दम नाही ः राजू शेट्टी

शक्तिपीठ, पूरबाधित शेतकर्‍यांसह 12 मार्चला मुंबईत मोर्चा

सांगली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार शेट्टी बोलत होते. ते म्हणाले, अलमट्टी धरणाच्या उंचीच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने जलशक्ती आयोगाकडे हरकत घेतली नाही. ही बाब गंभीर आहे. मी स्वतः केंद्रिय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेवून हरकत घेतली आहे. अलमट्टी बाबत महाराष्ट्र सरकारच्या नेत्यांमध्ये एवढा दम नाही. अलमट्टीच्या हरकती घेण्याबाबत आणि अलमट्टीची उंची वाढली तर याचा फटका पूर पट्ट्यांना बसणार आहे. त्यामुळे शक्तिपीठ आणि पूर बाधित शेतकर्‍यांना घेऊन येत्या 12 मार्च ला आझाद मैदानावर सर्व जिल्ह्यातील शेतकर्‍यांना घेऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास सांगली, कोल्हापूरसह कृष्णा आणि उपनद्यांना महापूर येऊन प्रचंड नुकसान होईल. त्यामुळे आलमट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये. त्यावर फेरविचार करण्याची गरज आहे. त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करुन वस्तुस्थितीची माहिती घेणे आवश्यक आहे.

raju-shetti-on-almatti-state-leaders-lack-the-strength-to-stop-the-rise-of-almatti-raju-shetti

शक्तिपीठ महामार्गवरुन शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे. आमची थडगी बांधून विकासाचे मनोरे बांधून तुम्ही ताजमहालत राहू नका. या शक्तिपीठ मुळे सांगली आणि कोल्हापूर आणि कराड या जिल्ह्याला धोका निर्माण होणार आहे. पुराचे पाण्याचे धरण होणार आहे. पाण्याची पातळी वाढणार आणि लवकर ओसारणार नाही. या शक्तिपीठ महामार्गाचा उपयोग काहीच होणार नसल्याचे माजी खा. शेट्टी यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, कॉ. उमेश देशमुख उपस्थित होते.

अलमट्टीविरोधात तक्रार न करणे गंभीर

कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाच्या उंची वाढीस जल लवादाने मान्यता दिल्यानंतर कोणत्याच राज्याने त्याविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार दाखल केलेली नाही. राज्य सरकारमधील कोणत्याही नेत्यांमध्ये अलमट्टीची उंची रोखण्यासाठी आवाज उठविण्याची धमक नाही. त्यामुळे याप्रकरणी कोणतीही स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा विषयच येत नसल्याचे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी सांगितल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज