rajkiyalive

RAJU SHETTI-SADABHAU KHOT : लोकसभेत दुसर्‍यांदा पराभव, विधानपरिषदेत दुसर्‍यांदा संधी, 

दिनेशकुमार ऐतवडे 9850652056

RAJU SHETTI-SADABHAU KHOT : लोकसभेत दुसर्‍यांदा पराभव, विधानपरिषदेत दुसर्‍यांदा संधी,  : संपूर्ण राज्यात शेतकर्‍यांचे तारणहार म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाउ खोत यांच्या वाटा आता वेगळ्या झाल्या आहेत. राजू शेट्टींच्या नशीबी अजूनही मोर्चे, आंदोलनच असून, सदाभाउंना मात्र सत्तेची उब मिळत आहे. नुकतेच राजू शेट्टींचा लोकसभेच्या रिंगणात दुसर्‍यांदा पराभव झाला तर सदाभाउंना विधानपरिषदेची दुसर्‍यांदा लॉटरी लागली आहे.

RAJU SHETTI-SADABHAU KHOT : लोकसभेत दुसर्‍यांदा पराभव, विधानपरिषदेत दुसर्‍यांदा संधी, 

मरळनाथपूर (ता. वाळवा) या खेड्यातील शेतकरी कुटुंबातील चळवळीतील कार्यकर्ते असलेले सदाभाऊ खोत यांना भाजपमधून पुन्हा एकदा विधानपरिषदेचे आमदार पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या उस पट्ट्यात शेतकरी चळवळीत एकेकाळी सर्जा-राजाची जोडी म्हणून ओळखले जाणार्‍या खोत दुसर्‍यांदा विधीमंडळाच्या सभागृहाचे सदस्य होण्याची संधी आली असताना या जोडीतील राजू शेट्टी यांचा मात्र लोकसभा निवडणुकीत दुसर्‍यांदा पराभव झाला.

लोकसभेत मोठा पराभव झाल्याने भाजप आता जमिनीवर आले आहे.

मित्र पक्षांना संधी देण्याचे धोरण त्यांनी अवलंबले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सदाभाउंनी भाजपवर प्रचंड तोंडसुख घेतले होते. तसेच हातकणंगले लोकसभा मतदार संघात खासदार धैर्यशील मानेंना निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत असताना त्यांनी माढा लोकसभा निवडणूक 2014 मध्ये लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा पराभव झाला. त्यावेळी स्वभिमानी भाजपबरोबर होती.

त्याचा पहिल्यांदा फायदा सदाभाउंना झाला. भाजपने त्यांना विधानपरिषदेवर घेतले व मंत्रीपदही दिले.

10 जून 2016 रोजी त्यांची विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली. यानंतर 8 जुलै 2016 रोजी त्यांना मंत्रीमंडळातही कृषी, फलोत्पादन व पणन आणि ग्रामीण पाणी पुरवठा या खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही काम करण्याची संधी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात मिळाली होती.

दरम्यानच्या काळात त्यांचे आणि राजू शेट्टींचे बिनसले.

त्यानंतर त्यांनी स्वतंत्र रयत क्रांती संघटना स्थापन केली. विधानपरिषदेची मुदत संपल्यानंतर त्यांना राजकीय विजनवासात जावे लागले होते. विधानपरिषदेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपकडे राजकीय पूनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून पश्चिम महाराष्ट्रात विरोधकांवर आक्रमकपणे टीका टिपणी करण्यासाठी त्यांच्या ग्रामीण ढंगातील वक्तत्वाचा लाभ घेता येईल या हेतूनेच भाजपने त्यांना पुन्हा संधी दिली आहे.

दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राज्ाू शेट्टींना लोकसभेच्या रणांगणात दुसर्‍यांदा पराभवास सामोरे जावे लागले आहे. त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या सदाभाउंना सत्तेची हवा मिळाली आहे. तर अजूनही राज्ाू शेट्टींंना म्हणावे तसे राजकीय व्यासपिठाचा फायदा होताना दिसत नाही.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज