rajkiyalive

RAMDAS ATHAWALE : आंबेडकरांनी वंचित आघाडी बरखास्त करुन सोबत यावे

RAMDAS ATHAWALE : आंबेडकरांनी वंचित आघाडी बरखास्त करुन सोबत यावे अजितदादा येताच मंत्रिमंडळ विस्तार, आम्ही बाजुलाच : आठवले

 

RAMDAS ATHAWALE : आंबेडकरांनी वंचित आघाडी बरखास्त करुन सोबत यावे

जनप्रवास । सांगली :

रिपब्लिकन पक्ष देश पातळीवर एनडीएसोबत आहे. माझ्या पक्षाला लोकसभेसाठी राज्यात दोन जागा देण्यात याव्यात. दलित मतांना आकर्षित करण्यासाठी आरपीआयला ताकद देण्याची गरज आहे. मंत्रिमंडळ विस्तारत आम्हाला न्याय देऊ असे सांगण्यात आले मात्र, अजितदादा येताच त्यांचा विस्तार झाला, अन् आमचा रखडल्याची खंत केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगलीत व्यक्त केली. प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करुन सोबत यावे. पक्षाच्या अध्यक्षपदासह माझे मंत्रिपद देवू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

महायुतीने आरपीआयला ताकद देण्याची गरज

शासकीय विश्रामधाममध्ये शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत अधिकार्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रिय मंत्री आठवले बोलत होते. ते म्हणाले, दलित मतांना आकर्षित करण्यासाठी महायुतीने आरपीआयला ताकद देण्याची गरज आहे. मंत्रिमंडळ विस्तारत आम्हाला न्याय देऊ असे सांगण्यात आले मात्र, अजितदादा येताच मंत्रिमंडळ विस्तार झाला. परंतु आमचा विस्तार बाजुलाच पडल्याची खंत आहे. राज्यात किमान एक मंत्रिपद मिळाले पाहिजे, याबाबतची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

 

ऐक्य करायचे असेल तर खालच्या पातळीवर एकत्र आले पाहिजे.

गावागावात एकत्र आहोत का? आपण एका नेत्याच्या पाठीमागे उभे राहते का? त्यामुळे लोक जर एकत्र आले तर आम्ही ऐक्य करण्यास तयार आहे. आंबेडकरांनी वंचित आघाडी बरखास्त करुन महायुतीमध्ये यावे. त्याना माझे मंत्रिपद मी द्यायला तयार असल्याचेही केंद्रिय मंत्री आठवले यांनी स्पष्ट केले.

मी बुद्धिस्ट असलो तरी मी बाबासाहेबांच्या संविधानाला मानणार आहे.

संजय राऊत म्हणतात, राम मंदिरचा सोहळा भाजपचा आहे. हा सोहळा बीजेपीचा नाही. हा सोहळा राम मंदिर ट्रस्टने ठेवला आहे. ज्यांना ज्यांना रामाबद्दल आदर आहे. त्यांनी दर्शनाला जावे. सगळे गेले की मीही जाईन. मी बुद्धिस्ट असलो तरी मी बाबासाहेबांच्या संविधानाला मानणार आहे. त्यामुळे मला निमंत्रण आले तर मी जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

इंडिया आघाडीला यश मिळणार नाही

इंडिया आघाडीने कितीही प्रयत्न केला तरी इंडिया आघाडीला यश मिळणार नाही.2024 च्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकांना सामोरे जाणार आहे. यावर्षी 400 च्या पुढे जागा मिळतील. ‘अबकी बार, पुन्हा मोदी सरकार’ असा लोक नारा देत आहेत. सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला असल्याचे केंद्रिय राज्यमंत्री आठवले यांनी सांगितले. यावेळी जगन्नाथ ठोकळे, संजय कांबळे, अरुण आठवले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा

hatkanagle loksabha : शिंदे गटाला कमळाचाच पर्याय?

प्रतीक पाटील मैदानात की शेट्टींवर दबावतंत्र…?

SANGLI LOKSABHA : विशाल पाटलांनी पळ काढू नये

शरद मोहोळच्या अट्टल ’गुंडगिरी’चा प्रवास

 

चार पक्षांचे बारा वाजतील

प्रकाश आंबेडकर हे सक्षम आणि अभ्यासू नेते आहेत. त्यामुळे काय निर्णय घ्यायचा तो अधिकार त्यांचा आहे. ते महायुती सोबत येणार नाहीत. त्यांनी महाविकास आघाडीसोबत जावे. चार पक्षांनी जरी बारा-बारा जागा वाटून घेतल्या. तर त्यांचे बारा वाजल्याशिवाय राहणार नसल्याचा टोला केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज