rajkiyalive

RATNAGIRI- NAGPUR MAHAMARG : अंकली-चोकाक दोन दिवसात भूसंपादन

RATNAGIRI- NAGPUR MAHAMARG : अंकली-चोकाक दोन दिवसात भूसंपादन

RATNAGIRI- NAGPUR MAHAMARG : अंकली-चोकाक दोन दिवसात भूसंपादन चौपट मोबदला दिला जाणार नाही तोपर्यंत काम सुरू होवू देणार नाही : राजू शेट्टी

 

RATNAGIRI- NAGPUR MAHAMARG : अंकली-चोकाक दोन दिवसात भूसंपादन

रत्नागिरी – नागपूर महामार्गातील चोकाक फाटा ते अंकली या रस्त्याच्या कामासाठी येत्या दोन दिवसात भुसंपादनाबाबतची कार्यवाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होणार असल्याचे समजते. सदरच्या रस्त्यासाठी होणा-या भूसंपादनासाठी शासनाकडून रेडीरेकनर अथवा बाजारभाव यापेक्षा जी रक्कम जास्त असेल त्याच्या दुप्पटीने मोबदला दिला जाणार असून, यामुळे चोकाक ते अंकली येथील शेतक-यांचे मोठे नुकसान होणार आहे. जोपर्यंत शासनाकडून पूर्वीप्रमाणे चौपट मोबदला दिला जाणार नाही तोपर्यंत या रस्त्याचे काम सुरू होवू देणार नसल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.

 

 

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, लोकसभेचा सदस्य असताना रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी तसेच तत्कालीन केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, सुशिलकुमार शिंदे, प्रतिक पाटील, जयवंतराव आवळे यांनी सर्वजण विशेष पाठपुरावा करून रत्नागिरी ते नागपूर हा कोल्हापूर – सोलापूर -लातूर ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गाची घोषणा केली.

यामधील रत्नागिरी ते नागपूर या मार्गातील चोकाक फाटा ते अंकली हा रस्ता वगळता सर्व रस्त्याच्या भूसंपादनास पूर्वीच्या शासन निर्णयाप्रमाणे चौपटीने मोबदला देण्यात आला आहे. काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे चोकाक फाटा ते अंकली भूसंपादन रखडले होते. मात्र यामध्ये शेतकर्‍यांचा कोणताच दोष नसून शासनाच्या दिरंगाईमुळे सदरचा 22 किलोमीटरचे भूसंपादन होवू शकले नाही.

सध्या चोकाक फाटा ते अंकली येथील नवीन रस्त्याच्या चोकाक, अतिग्रे , माणगावेवाडी, हातकंणगले, मजले, तमदलगे, निमशिरगांव , जैनापूर , उदगाव या गावातील भुसंपादनाची कार्यवाही युध्दपातळीवर सुरू असून, येत्या दोन दिवसात सदर मार्गावरील भुसंपादनाची माहिती प्रसिध्द केली जाणार आहे. यामधील बाधित शेतक-यांना शासनाच्या नवीन निर्णयाप्रमाणे दुप्पटीने मोबदला दिला जाणार आहे.

 

 

यापुर्वीही शिरोली ते अंकली रस्त्याचे 2008 साली भुसंपादन होत असताना अत्यल्प दराने मोबदला दिला गेला आहे. यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या मार्गावरील अनेक शेतक-यांची संपु्र्ण जमीन संपादित होणार असून त्यामुळे ते भुमिहीन होणार आहेत. जर शासनाने रत्नागिरी ते नागपूर पर्यंत जो मोबदल्याचा दर शेतक-यांना दिला आहे तोच दर या शेतक-यांना द्यावा व भुसंपादनाची पुढील तीन ए व तीन डी ची कार्यवाही करावी अन्यथा परिसरातील सर्व शेतक-यांना सोबत घेऊन जन आंदोलन उभारून रस्त्याचे काम बंद पाडणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज