rajkiyalive

RATNAGIRI-SOLAPUR-HIGHWAY : अंकली-बोरगाव महामार्गावर धोकादायक भेगा..

RATNAGIRI-SOLAPUR-HIGHWAY : अंकली-बोरगाव महामार्गावर धोकादायक भेगा.. जिल्ह्यातील अनेक रस्त्याबाबत कायम ओरड सुरू असतानाच गाजावाजा करून उद्घाटन करण्यात आलेल्या रत्नागिरी-सोलापूर या महामार्गावर अंकली ते बोरगाव दरम्यान अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून, यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.

 

 

RATNAGIRI-SOLAPUR-HIGHWAY : अंकली-बोरगाव महामार्गावर धोकादायक भेगा..

शरद सातपुते : मिरज

पेठ सांगली महामार्गाच्याही कामाचा सोमवारी शुभारंभ झाला परंतु वर्षपूर्ती होण्याअगोदरच रत्नागिरी – सोलापूर महामार्गाची दूरवस्था झाली आहे. याबाबात चौकशी होवून संबंधीतांवर कारवाई करावी, अशी मागणी होताना दिसत आहे. काहीच दिवसापूर्वी सातारा येथे केेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. 2023 मध्ये हा महामार्ग वाहुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

एक्केचाळीस किलोमीटर दरम्यान अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत.

या महामार्गावरील अंकली ते बोरगाव या एक्केचाळीस किलोमीटर दरम्यान अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. या रस्त्याचे काम दिलीप बीडकॉम् या कंपनीने केले आहे. यासाठी अकराशे दोन कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. इतका मोठा खर्च करूनही रस्त्याच्या दर्जाबाबत अनेक ठिकाणी त्रुटी दिसून येत आहेत. मिरज, अंकली, वड्डी या हद्दीमध्ये महामार्गावर अनेक ठिकाणी ब्रीजवर मोठ्या भेगा पडल्याचे दिसून येत आहेत. या भेगा मोठ मोठ्या दिसत असून, ब्रीजला धोका निर्माण झाला आहे. मुंबई, पुण्यामध्ये असे भेगा पडून अनेक ठिकाणी ब्रिज कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मिरज हद्दीत या महामार्गावर सतरा ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. त्यातून महामार्गावरील साचणारे पाणी या भेगामधून खाली उतरत आहे.

 

 

या अंकली ते बोरगाव दरम्यान काम करणारे कॉन्ट्रॅक्टर लाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही असे होत असते त्या बाबत त्यांनी अधिक माहिती साठी कॉन्ट्रॅक्टर सतीश जैन यांच्याकडे चौकशी करावी अशी माहिती दिली.

हेही आवर्जुून वाचा

SANGLI : महापालिकेचा ई-बससेवेचा प्रस्ताव दहा दिवसात शासनाकडे

100 व्या नाट्यसंमेलनाची सांगलीत मुहुर्तमेढ

सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल धोकादायक

सांगलीत दररोज सात जणांना कुत्र्याचा चावा

सध्या या रस्याची दुरूस्ती सुरू आहे. परंतु एक वर्षातच एवढा मोठा महामार्ग नादुरूस्त कसा होता, याबाबत शंका व्यक्त होवू लागल्या आहेत. मोदी सरकार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या काळात केलेल्या रस्ता कामाची भाजप तोंडभरून कौतुक करीत असते. परंतु रत्नागिरी – सोलापूर या मोठ्या महामार्गाची जर वर्षभरातच दूरवस्था होत असेल तर या संपूर्ण रस्ता कामाची चौकशी होणे गरजेचे आहे.

 

संबंधीतांना लवकरच नोटीसा : जांभळे

याबाबत सबंधित नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी जांभळे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी हे काम दिलीप बिडकॉम यांच्यामार्फत झाले असून त्यांच्या सोबत सोळा वर्षांचा करार केला आहे.अशा भेगा, पॅचवर्क करणे किंवा पॅनल बदलने असा करार आहे. त्यांना या बाबत नोटीस काढू.

मुख्य कंत्राटदार सतीश जैन यांची उडवाउडवीची उत्तरे

याबाबत दिलीप बिल्डकॉमचे मुख्य कंत्राटदार सतीश जैन यांच्याशी सवांद साधला असता त्यांनी या रस्यांची तुलना मिरज शहराची केली. मिरज शहरातील रस्ते कसे आहेत बघा, त्या पेक्षा आम्ही चांगले रस्ते केले आहेत. काँक्रीटचा मूळ स्वभावच वेगळे होण्याचा आहे. कामाचा दर्जा ठिक आहे. आम्ही सोळा वर्षे याची देखभाल दुरूस्ती करणार आहोत, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज