rajkiyalive

samdoli news : सहकारातील नवे नेतृत्व राजवर्धन पाटील

samdoli news : सहकारातील नवे नेतृत्व राजवर्धन पाटील : मिरज तालक्यातील  समडोळीचे राजकारण, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणार्‍या जि. सु. पाटील घराण्यातील तिसर्‍या पिढीचे वारसदार राजवर्धन पाटील यांचा आज 23 फेबु्रवारी रोजी वाढदिवस वडिल सुरेश पाटील आणि आजोबा जि. सु. पाटील यांच्या पावलावर पाउल ठेवून सहकार क्षेत्रात काम सुरू केलेल्या राजवर्धन पाटील यांना राजबिंडा राजवर्धन तसेच सहकारातील नवे नेतृत्व असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

samdoli news : सहकारातील नवे नेतृत्व राजवर्धन पाटील

समडोळीचे जिनगोंडा सुरगोंडा उर्फ जि. सु. पाटील यांनी समडोळीचे 13 वर्षे सरपंचपद भूषवून विक्रम केला आहे. त्यांच्यातील राजकारणातील चुणूक पाहून मुख्यमंत्री असलेल्या वसंतदादा पाटील यांनी त्यांना सांगली साखर कारखान्यावर काम करण्याची संधी दिली. संचालक म्हणून काम करीत असताना त्यांना व्हा. चेअरमन पदाचीही संधी दिली. जि. सु. पाटील यांनी सहकारात काम करीत असताना गावात पाणीपुरवठा संस्था, दूध संस्थेची स्थापना केली.

samdoli-news-rajvardhan-patil-is-the-new-leader-in-the-cooperative

त्यांच्याच पावलावर पाउल ठेवून त्यांचे चिरंजिव सुरेश पाटील यांनी आपल्या राजकारणाची सुरूवात जि. प. सदस्य म्हणून केली. त्यानंतर समडोळी शिक्षण संस्थेची अध्यक्षपदाची धुरा सांभाळून शिक्षण संस्थेला एका अत्युच्च उंचीवर नेवून ठेवली. आज समडोळी शिक्षण संस्थेचे नाव पंचक्रोशीत गाजत आहे. सुरेश पाटील यांना आपल्या आयुष्यात सर्वात मोठे काम केले ते म्हणजे शांतीसागर को ऑप के्रडीट सोसायटीची स्थापना. आज या संस्थेकडे सुमारे अल्पावधीतच 70 कोटीच्या ठेवी असून, जनमानसात शांतीसागरने आपले नाव कोरले आहे. समडोळी, सांगली वखारभाग, सांगली नेमीनाथनगर, सांगली बालाजीनगर आणि तुंग या शाखांद्वारे शांतीसागरची वाटचाल सुरू आहे.

सोन्याचा चमचा तोंडात घेवून जन्माला आलेल्या सुरेश पाटील यांचे चिरंजिव राजवर्धन पाटील यांनीही आता सहकार क्षेत्रात काम सुरू केले आहे. शांतीसागर को. ऑप के्ंरडीट सोसायटीत त्यांना संचालक पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. आपले आजोबा, वडील यांच्या सहकाराचा अभ्यास त्यांना अगदी कमी वयात मिळाला आहे. पाच शाखांचा व्याप ते वडिलांसोबत पाहत आहेत. आपला उद्योग व्यवसाय पाहून त्यांनी पतसंस्थेत लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे.

samdoli-news-rajvardhan-patil-is-the-new-leader-in-the-cooperative

भविष्यात शांतीसागर को. ऑप के्रडीट सोसायटीला आणखी नावारूपाला आण्याचा आपला प्रयत्न असल्याचे यावेळी राजवर्धन पाटील यांनी सांगितले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा….

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज