rajkiyalive

SANGLI : समडोळी येथील एका शेतकऱ्याची ९ लाख २६ हजार रुपयांना फसवणूक

SANGLI : समडोळी येथील एका शेतकऱ्याची ९ लाख २६ हजार रुपयांना फसवणूक . ऊस तोडणी मजूर पुरविण्याच्या आमिषाने शेतकऱ्याची फसवणूक : बीडच्या भामट्यांनी ९ लाखांना घातला गंडा.

 

SANGLI : समडोळी येथील एका शेतकऱ्याची ९ लाख २६ हजार रुपयांना फसवणूक

ऊस तोडीसाठी मजुर पुरविण्याचे आश्वासन देवून मिरज तालुक्यातील समडोळी येथील एका शेतकऱ्याची ९ लाख २६ हजार रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी किरण श्रीपाल चव्हाण ( वय ४७ रा. बसस्थानकानजीक, समडोळी ) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित संतोष गोवर्धन चव्हाण आणि वसंत गोवर्धन चव्हाण (रा. गाडी उतार तांडा, वडवणी, जि. बीड ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी किरण चव्हाण हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील समडोळी मध्ये राहतात. चव्हाण यांना २०१७ साली  शेतातील उसतोडीकरिता मजूरांची गरज होती. त्यावेळी त्याच्यांशी संशयितांनी संपर्क साधला आणि मजूर पुरविण्याचे आश्वासन दिले.

 

त्यांनी मजूर पुरविले नाहीत.

याकरिता फिर्यादी यांनी वेळोवेळी संशयितांना बॅकेच्या माध्यमातून तसेच रोखीने १४ लाख १५ हजार रुपये दिले. परंतु त्यांनी मजूर पुरविले नाहीत. त्यामुळे फिर्यादी किरण चव्हाण यांनी संशयितांकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी ४ लाख ८९ हजार रुपये चव्हाण यांना परत दिले. उर्वरित ९ लाख २६ हजार रुपये संशयितांनी परत दिले नाहीत. वारंवार मागणी करुनही संशयितांनी पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरवात केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच किरण चव्हाण यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ATPADI : घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबंद

कर्नाळ मध्ये भरधाव कार ने दुचाकीला उडवले : अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी.

सांगली : मिरज तालुक्यातील कर्नाळ मध्ये भरधाव कारने दुचाकीला उडवल्या अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. सदरचा अपघात हा सोमवार दि. ०१ जानेवारी रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी जखमी गोविंद नारायण पडळकर (वय ३५ रा. अभयनगर, सांगली) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या अपघातात गोविंद यांच्या पत्नी कविता पडळकर या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी गोविंद पडळकर हे शहरातील अभयनगर येथील समाधान कॉलनी मध्ये आपल्या कुटुंबियांसह राहत असून ते सेंट्रिंगचे काम करतात. त्यांचे तासगाव तालुक्यातील तुरची येथे शेत आहे. सोमवार दि. ०१ जानेवारी रोजी दुपारी ते पत्नी कविता यांच्यासह दुचाकीवरुन (क्र. एमएच १० डीए ९१३४) तुरची येथील शेतात कामानिमित्त गेले होते. शेतातील काम आटोपून सायंकाळी सांगलीला परत येत असताना ते कर्नाळ – सांगली रस्त्यावरील हॉटेल रमा नजीक आले.

पती – पत्नी दोघेही रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले.

यावेळी समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या एका निळ्या रंगाच्या कारने त्यांच्या दुचाकीला समोरून आलेल्या कारने जोरदार धडक दिली. यामध्ये पती – पत्नी दोघेही रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले. फिर्यादी गोविंद यांच्या डोके आणि खांद्यास दुखापत झाली तर पत्नी कविता यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. दुचाकीचे देखील नुकसान झाले. चारचाकीचालक घटनास्थळी न थांबता तेथून पसार झाला आहे. उपस्थितांनी जखमी दोघांना रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर गोविंद पडळकर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

———————–

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज