rajkiyalive

समडोळीतील कमान ठरत आहे लक्ष्यवेधी

आचार्य शांतीसागर महाराज यांच्या आचार्य पदारोहण शताब्दी आणि वीराचार्य मॅरेथॉनच्या निमित्ताने मिरज तालुक्यातील समडोळी येथील कमान लक्ष्यवेधी ठरत आहे. या कमानीचे नुकतेच माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

आचार्य शांतीसागरज महाराज यांना समडोळी येथे 8 ऑक्टोंबर 1924 रोजी आचार्य ही पदवी देण्यात आली होती. त्या घटनेला येणार्‍या दसर्‍यापासून 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने समडोळीत येणार्‍या वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा

समडोळीत यजमानपदाचा मान माणिक खोत यांना
समडोळीत जैन समाजाने घालून दिला आदर्श

समडोळीत शांतीसागर गुंफा शिलान्यासची भव्य मिरवणूक

आचार्य शांतीसागर शताब्दी महोत्सव जोरदार करण्याचा संकल्प

त्याचाच एक भाग म्हणून रविवार 22 ऑक्टोंबर वीर सेवा दल आणि शांतीसागर के्ंरडीट सोसायटीच्यावतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यता आले होते. या स्पर्धेसाठी संपूर्ण गावात सजावट करण्यात आली होती. गावात विविध मंडळांच्यावतीने स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. परंतु सर्वात लक्षवेधी कमान ठरली ते न्यू विजय मंडळाने उभी केलेल्या कळशांची कमान.

या कमानीसाठी मंडळाचे कार्यकर्ते आठ दिवस राबत होते. या कमानीसाठी सुमारे 207 कळश्या मागविण्यात आल्या. स्टील डिझाईन करण्यात आले. क्रेन मागवून ही कमान उभी करण्यात आली. संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान याकमानीचे सर्वजण कौतुक करताना दिसत होते.
ही कमान कायमस्वरूपी ठेवणार असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज