समडोळी येथील श्र्री 1008 भ. शांतिनाथ दिगंबर जिन मंदिर यांच्यावतीने फेब्रुवारी 2024 मध्ये होणार्या श्र्री इंद्रध्वज आराधना महामहोत्सवात सौधर्म इंद्र यजमानपदाच मान धर्मानुरागी माणिक आण्णा खोत यांना मिळाला.
रविवारी सायंकाळी येथील शांतीनाथ दिगंबर जिन मंदिराच्या प्रांगणात फेबु्रुवारीमध्ये होणार्या पुजेच्या सर्व मानकर्यांचा सवाल काढण्यात आला. यावेळी धर्मानुरागी माणिक आण्णा खोत यांनी यजमानपदाचा मान मिळविला. 9 लाख 9 हजार 901 रूपयाची सर्वोच्च बोली त्यांनी बोलली. यावेळी मंदिर कमितीचे सर्व सदस्य, श्र्रावक, श्र्राविका, प. पू. आचार्य श्र्री 108 जिनसेनजी महाराज, प. पू. 108 श्र्री संयमसागरजी महाराज, स्वस्तिश्र्री लक्ष्मीसेनजी भट्टारक पट्ट्ाचार्य महास्वामी, कोल्हापूर आदी उपस्थित होते.
श्र्री 1008 श्र्री शांतिनाथ दिगंबर जिन मंदिर, समडोळीच्या मंदिर निर्माण शताब्दी वर्षानिमित्त 15 फेब्रुवारीते 21 फेब्रुवारी 2024 अखेर आर्ष परंपरेनुसार श्र्री इंद्रध्वज आराधना महामहोत्सव संपन्न होणार आहे. त्यानिमित्त हे सवाल काढण्यात आले.
यावेळी सौधम्र इंद्र इंद्राणी, चक्रवर्ती इंद्र, ईशान्य इंद्र इंद्राणी, धनपती कुबेर इंद्र इंद्राणी, सुवर्ण सौभाग्यवती, महायज्ञनायक,अष्टकुमारिका, पंचकुमार, ध्वजारोहण, मंडप उद्घाटक, मंगल कलश स्थापना, अखंड दीप स्थापना, प्रथम दिन जलकुंभ, दोन हत्ती व 7 घोडे आदींचे सवाल काढण्यात आले.
या पुजेसाठी प्रतिष्ठचार्य अजित उपाध्ये, संदेश उपाध्ये तसेच स्थानिक पंडित म्हणून जिनपाल उपाध्ये, विजयकुमार उपाध्ये, आशिष उपाध्ये काम पाहणार आहेत. संगीतकार सुयोग पाटील असणार आहेत.
इतर सवालधारक खालीलप्रमाणे
चक्रवर्ती इंद्र इंद्राणी
भरतकुमार भूपाल मगदूम, सुनिता भरतकुमार मगदूम
ईशान्य इंद्र इंद्राणी
कुमार नेमाण्णा चव्हाण, संगीता कुमार चव्हाण
धनपती कुबेर
सचिन कुमार बेले, अर्चना सचिन बेले
सुवर्णा सौभाग्यवती
प्रदीप आदाप्पा खोत, अरूणा आदाप्पा खोत
महायज्ञनायक
आक्काताई श्र्रीपाल देसाई, श्र्रीपाल देवाप्पा देसाई
अष्टकुमारीका
पद्मावती नंदकुमार खोत, अनुजा अभयकुमार मगदूम, स्नेहल सुभाष खोत, पलक वैभव पाटील, मोसा जिवंधर चव्हाण, असरा प्रविण मुरके, परी जनगोंडा पाटील
ध्वजारोहणकर्ता
सुरेंद्र बाबु खोत
प्रथम दिवस हत्तीवरून जलकुंभ आणने
अनिल चवगोंडा पाटील, संदीप चंद्रकांत खोत
प्रथम दिन घोडा
अरूण भुजाप्पा ऐतवडे, दिक्षीता शांतिनाथ मगदूम, श्र्रेयांश शितल खोत, ऋुतुजा नरसू चव्हाण, स्वाती बापूसो चव्हाण, सायली सुनील चव्हाण, साक्षी सुनिल चव्हाण
पंचकुमार
देवाप्पा देसाई.
आहारदान
इंद्राबाई भूपाल पाटील, 151000, संजय आण्णा मगदूम 151000, राहूल धनपाल रूगे 51000, सुलक्षणा सुदर्शन खोत 51000, राजश्र्री सूर्यकांत खोत 51000, शर्मिला दिलीप खोत 51000, बाबासो देवाप्पा खोत 51000
हेही वाचा
समडोळीत जैन समाजाने घालून दिला आदर्श
समडोळीत शांतीसागर गुंफा शिलान्यासची भव्य मिरवणूक
आचार्य शांतीसागर शताब्दी महोत्सव जोरदार करण्याचा संकल्प

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



