विक्रम चव्हाण
Sand, pimple mafia :माफियांना सुगीचे दिवस : महसूल, पोलिसांत नाही ताळमेळ : धमक्या, मारहाणीच्या घटनांत वाढ : महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या हेवेदाव्यात जिल्ह्यात वाळू, मुरुम माफियांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांसह महसूलच्या अधिकारी, कर्मचार्यांना धमक्या देण्यापासून मारहाण करण्याच्या घटना समोर येत आहेत. माफियांवर तक्रारीनंतही अपेक्षित कारवाई होत नाही. झाली तर तातडीने जामिन होतो, त्यामुळे वाळू, मुरुम माफियांना कायद्याचे भय राहिलेले नाही. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावरच जिल्हा प्रशासन जागे होणार काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी तातडीने जिल्हा पोलिस अधीक्षकांशी बैठक घेत संयुक्त कारवाईचा बडगा उगारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
Sand, pimple mafia :माफियांना सुगीचे दिवस : महसूल, पोलिसांत नाही ताळमेळ : धमक्या, मारहाणीच्या घटनांत वाढ
जीव गेल्यावरच यंत्रणेला जाग येणार का?
हरीत लवादाच्या निर्णयानुसार जिल्ह्यात वाळू उपसा करण्यास बंदी आहे. तरीही येरळा, कृष्णा, वारणा आदी नद्यांमधून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो. वाळू तस्करांचा हा रात्रीचा खेळ महसूलसह पोलिसांनाही माहित आहे. याशिवाय मुरुम तस्करीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून सांगली, मिरजेसारख्या शहरांमधये मोठ्या प्रमाणात मुरुम आणला जातो. परवान्यापेक्षा कित्तेक पटीने उत्खनन केले जाते ही वस्तुस्थिती आहेे. पण ठोस कारवाई होत नाही. याला महसूल आणि पोलिस प्रशासन जबाबदार आहे. या दोन्ही यंत्रणामध्ये कोणताही समन्वय नाही. वास्तविक महसूलच्या अधिाकार्यांच्या बरोबर कारवाई करताना पोलिसांची कुमक गरजेची असते.
पण जिल्ह्यात असे होताना दिसत नाही.
दोन्ही यंत्रणांच्या हेव्यादाव्यात माफियांगिरी करणारे मात्र सहीसलामत सुटतात.
कारवाई झालीच तर ती केवळ पोेलिसांची असते किंवा महसूलच्या अधिकारी, कर्मचार्यांची. दोन्ही यंत्रणांच्या हेव्यादाव्यात माफियांगिरी करणारे मात्र सहीसलामत सुटतात. यंत्रणेतील या त्रुटीमुळे वाळू, मुरुम माफियांना सुगीचे दिवस आले आहेत. काही दिवसांपूर्वी तासगाव तालुक्यांमध्ये महसूलच्या अधिकारी, कर्मचार्यांना धमकाविण्याचा प्रयत्न झाला. दोन दिवसांपूर्वी तासगाव तालुक्यातीलच येळावी येथे काही सामाजिक कार्यकर्त्यांना धमकी दिल्याची घटना घडली. संपूर्ण राज्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनाने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचीच पुनरावृत्ती करु अशी धमकी सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आली. जिल्ह्यात अन्य ठिकाणीही मुरुम, वाळू तस्करांची दादागिरी सुरुच आहे. याला आता आळा घालण्याची वेळ आली आहेे.
sand-pimple-mafia-sand-pimple-mafia-harvest-days-for-mafia-no-coordination-between-revenue-and-police-increase-in-threats-assaults
महसूल आणि पोलिसांमध्ये असलेला असमन्वय, राजकिय पुढार्यांच्या वरदहस्तामुळेच माफियांंना सुगीचे दिवस आल्याची चर्चा जिल्हाभरामध्ये सुरु आहे. अशा माफियांना ताळ्यावर आणण्याचे मोठे आव्हाण जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हापोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासमोर आहे. दोन्ही यंत्रणांनी समन्वयाने काम करत माफियांची पाळेमुळे खणून काढण्याची गरज आहे. पोलिस आणि महसूल यंत्रणेने एकत्र काम करत माफियांंचे कंबरडे मोडेल पण त्या पध्दतीने नियोजनबध्द कारवाई करण्याची आवश्यकता आहे. परंतू सद्यातरी असे होताना दिसत नाही. त्यामुळे वाळू, मुरुम, दगड माफियांचे चांगलेच फावले आहे.
जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?
जिल्हयात गौण खनिज उत्खनन, तस्करीमध्ये वाढ झाली आहे ही वस्तुस्थिती आहे. याला स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर महसूल, पोलिस यंत्रणाही तितकीच जबाबदार आहे. या यंत्रणेतील भ्रष्ट अधिकारी, कर्मचार्यांचाच माफियांना आशिर्वाद असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे एखादा प्रामाणिक अधिकारी कारवाई करण्यास गेला की त्याला पध्दतशीरपणे त्रास दिला जातो. त्याने तक्रार केली तरी दखल घेतली जात नाही. परिणामी माफियांची मुजोरी वाढली आहे. आता धमक्या दिल्या जात आहेत. याची गंभीर दखल न घेतल्यास मुडदे पडण्यास वेळ लागणार नाही. एखाद्याचा मुडदा पडल्यावरच यंत्रणेला जाग येणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



