rajkiyalive

SANGLI : आगामी निवडणुका जनता दल लढविणार

SANGLI : आगामी निवडणुका जनता दल लढविणार” राज्यातील आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जनता दल ताकदीने लढविणार आहे. जिल्ह्यात पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी कामाला लागावे. पक्षाकडून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बळ देवू, असा प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी सांगलीत केले.

SANGLI : आगामी निवडणुका जनता दल लढविणार

जनप्रवास । सांगली

येथील सिंधी पुरुषार्थी भवनमध्ये जिल्हा जनता दल कार्यकर्त्यांच्या मेळावा प्रदेशाध्यक्ष शेवाळे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मुंबई प्रदेश जनता दल उपाध्यक्ष अ‍ॅड सुहास बने, प्रदेश सरचिटणीस बाळेशा नाईक, युवा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष सुमित पाटील,प्रेमचंद पांडे, सलीम भाटी, एस. ए. पाटील, सन्मती गौडाजे, संजय ऐनापुरे, वितराग देवर्षी, प्रणव पाटील, पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख अ‍ॅड फैय्याज झारी, महिला आघाडीप्रमुख अ‍ॅड वैशाली देवर्षी उपस्थित होत्या.

प्रदेशाध्यक्ष शेवाळे म्हणाले, सध्याच्या राजकारणामध्ये अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय वातावरण प्रदुषित झाले आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांना दिशा देणारे आणि मार्गदर्शकांची कमतरता भासत आहे. स्वर्गीय माजी आमदार शरद पाटलांनी राज्याची धुरा माझ्यावर सोपविली. जनता दलाच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. कार्यकर्त्यांच्या बळावर यापुढेही राज्यामध्ये जनता दल पुन्हा भरारी घेण्यासाठी प्रयत्नशिल आहे.

जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत गायकवाड यांनी स्वागत केले. या मेळाव्यास डॉ. जयपाल चौगुले, अ‍ॅड शब्बीर आलासे, राजगोंडा पाटील, प्रा. सलीम सय्यद, प्रवीण देवरुखकर, अश्विन पाटील, महावीर सौंदत्ते, विनयश्री पाटील, डॉ. सुप्रिया आडमुठे, मालती ऐडवान, कमलताई शिर्के, सुमनताई चंदुरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा सचिव जनार्धन गोंधळी यांनी आभार मानले.

शरद पाटील यांचे कार्य पुढे चालवू

शेतकरी, कष्टकरी, कामगार अशा उपेक्षित घटकांचे आधारस्तंभ माजी आमदार शरद पाटील यांनी सर्वसामान्य व्यक्ती केंद्रबिंदू काम केले. त्यांच्या सर्वांगीण कल्याणसाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या या कार्याचा वारसा यापुढेही सक्षमपणे चालवू, असा विश्वास जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी व्यक्त केला.

फोटो ओळी – सांगलीत जनता दलाच्या मेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, सोबत अ‍ॅड सुहास बने, बाळेशा नाईक, सुमित पाटील, शंकरराव गायकवाड आदी

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज