कृषी शास्त्रज्ञांचे मत : भविष्यातील धोका टाळण्यासाठी शाश्वत शेतीकडे वळा
जनप्रवास । सांगली
sangli aggricultuare news : पश्चिम महाराष्ट्रात भाजीपाल्यावर किटकनाशकांचा सर्वाधिक वापर : बदलत्या जीवनशैलीनुसार शेतीकरी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक भाजीपाल्यावर कीटकनाशकांचा वापर करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शास्त्रज्ञानी कीटकनाशकाच्या वापराचे प्रमाण ठरवले असतानाही त्याचा अतिरिक्त वापर होत आहे, त्यामुळे मानवी शरिरासह प्राणी आणि निसर्गावर परिणाम होत असल्याची भीती कृषी शास्त्रज्ञ डॉ.अमित जाधव यांनी व्यक्त केली. भविष्यातील धोका टाळण्यासाठी शाश्वत शेतीकडे वळावे, असा सल्ला केंद्र शासनाच्या कृषी कार्यशाळेमध्ये शास्त्रज्ञांनी दिला.
sangli aggricultuare news : पश्चिम महाराष्ट्रात भाजीपाल्यावर किटकनाशकांचा सर्वाधिक वापर
सांगलीत भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत कार्यरत पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्यावतीने शाश्वत शेतीसाठी कृषी तंत्रज्ञान’ या विषयावर कृषी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अणुऊर्जा विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. बी. मिश्रा, कीटकनाशक तज्ञ डॉ. अमित जाधव अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ, जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागवान, पत्र सूचना कार्यालय (महाराष्ट्र आणि गोवा) चे संयुक्त संचालक महेश अयंगार यांनी मार्गदर्शन केले.
तंत्र्यपूर्व काळामध्ये शेती स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केली जात होती.
शेतात कीटकनाशक व तन नाशक वापराबाबत बोलताना डॉ. अमित जाधव म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शेती स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केली जात होती. 1970 च्या दशकात कृषीतज्ञ डॉक्टर स्वामीनाथन यांनी मेक्सिको मेक्सिको मधून गावाचे बियाणे मागवून त्याची देशात भारतात प्रगती केली. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात परिस्थिती बदलत चालल्याने अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकर्यांकडून केला जातो. ज्यादा उत्पादनाच्या नादात कीटकनाशकांचे प्रमाण वाढले आहे. टोमॅटो, मका, गहू आणि भाजीपाला या सर्व पिकांवर कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर होत आहे. यापूर्वी सर्वाधिक कीटकनाशकाचा वापर कढीपत्त्यावर झाल्याचे संशोधनात आढळून आले होते. पंजाबमध्ये गव्हाच वर अधिक कीटकनाशकाचा वापर केल्याचे आढळून आले त्याचा वापर शरीराला कशा पद्धतीने घातक आहे, याबाबत शेतकर्यांमध्ये प्रबोधन केले जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रात भाजीपाल्यावर सर्वाधिक कीटकनाशकांचा वापर करण्यात येत आहे.
शास्त्रज्ञाने कीटकनाशक वापरण्याचे प्रमाण ठरवून दिले आहे, मात्र सर्व कीटकनाशक एकत्र करून त्याची फवारणी शेतकर्यांकडून केली जाते. त्याचा परिणाम पिकासह शरीरावर होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतोय. अधिक कीटकनाशकाचा वापर करून पुढील पिढीचा नाश होणार नाही, याबाबतची दक्षता घेण्याची आता वेळ आली आहे. पिकावर होणार्या किडीचा समतोल राखावा. कीड संपवू नका. कीड संपवण्याच्या नादात आपण अतिरिक्त फवारणी टाळावी असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
अग्रणी बँकेचे व्यवस्थापक वेताळ यांनी कृषी विभागाच्या अनुदानावरील योजना आणि बँकांकडून मिळणार्या व्याजदराच्या सवलती बाबतची माहिती दिली. शेतकर्यांसाठी वैयक्तिक आणि सामूहिक योजनांसाठी केंद्र शासनाकडून दोन कोटी पर्यंत प्रकल्प उभारता येत आहे. त्यामध्ये कोल्ड स्टोरेज गोदाम हार्वेस्टिंग मशीन कुक्कुटपालन आधी व्यवसायासाठी अनुदान दिले जाते. याशिवाय शेतकर्यांसाठी पीक कर्ज मर्यादा वाढवण्यात आले असून सहा टक्के व्याज आकारणी केली जाते. मात्र केंद्राने राज्य सरकारच्या योजनातून व्याज परताव्याची रक्कम परत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारची धोरणे आणि त्याच्याशी निगडीत विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत सक्षमपणे पोहोचवणे, माध्यमांशी संबंधित विषयांवर चर्चा आणि प्रसार माध्यमे यांच्यातील परस्पर संवाद वाढवणे हा या वार्तालाप कार्यक्रमाचा उद्देश राहिला.
अडीच हजार कीटकनाशक कंपन्यांचे प्रस्ताव
देशात सध्या 820 कीटकनाशक कंपन्या आहेत. याशिवाय नवीन परवान्यासाठी अद्याप दोन ते अडीच हजार प्रस्ताव प्रलंबित असल्याचे डॉ. अमित जाधव यांनी सांगितले. पिकावरील कीड नियंत्रणात आणण्यासाठी कीटकनाशक वापरण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे अनेक कंपन्या कीटकनाशक बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. कीटकनाशक वापराने परिस्थिती घातक बनत आहे. त्यामुळे कीटकनाशकाचा वापर मर्यादित करणे, ही काळाची गरज बनत चालली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.