rajkiyalive

SANGLI BANK : जिल्हा बँकेच्या निमणी शाखेतही अवकाळ निधीच्या 21 लाखावर डल्ला

सांगली / प्रतिनिधी

SANGLI BANK : जिल्हा बँकेच्या निमणी शाखेतही अवकाळ निधीच्या 21 लाखावर डल्ला : जिल्हा बॅँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखेत शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीवर बॅँकेच्या कर्मचार्‍याने डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोनच दिवसात बॅँकेच्या निमणी (ता. तासगाव ) शाखेतही असाच प्रकार घडल्याचे आढळले आहे. या शाखेतील कर्मचारी प्रमोद कुंभार यांनी अवकाळी मदत निधीतील तब्बल 21 लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. तसेच तालुक्यातील सिध्देवाड शाखेत अशाच प्रकारचा अपहार झाल्याचे समजते.

SANGLI BANK : जिल्हा बँकेच्या निमणी शाखेतही अवकाळ निधीच्या 21 लाखावर डल्ला

शासनाने दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या तसेच पिक विम्याच्या मदतीचा निधी वेळो वेळी जिल्हा बॅँकेला दिलेला आहे. सदरचा निधी संबधीत लाभार्थी शेतकर्‍यांच्या बॅँक खात्यावर वर्ग केला जातो. मात्र ज्यांची खाती बंद आहेत तसेच अन्य बॅकांत खाती आहेत व अन्य कारणांनी अनेक लाभार्थी शेतकर्‍यांचा कोट्यवधी रुपयांचा मदत निधी बॅँकेत पडून आहेत. बॅँकेच्या विविध शाखांत हा निधी अवकाळी मदत, दुष्काळ निधी व अन्य नावांनी स्वतंत्र खात्यावर ठेवण्यात आला आहे.

निमणी शाखेतील अवकाळी मदत निधीवर सुमारे 21 लाखांचा डल्ला मारला असल्याचे उघडकीस आले आहे.

जिल्हा बॅँकेच्या निमणी (ता. तासगाव) शाखेतील लिपीक प्रमोद कुंभार यांनी निमणी शाखेतील अवकाळी मदत निधीवर सुमारे 21 लाखांचा डल्ला मारला असल्याचे उघडकीस आले आहे. कुंभार यांची चौकशी सुरुच असून या घोटाळ्यातील रक्कमही वाढण्याची शक्यता आहे. तासगाव तालुक्यातील मार्केड यार्ड, निमणी शाखेतील घोटाळ्यातनंतर सिध्देवाडी शाखेतही असाच प्रकार घडल्याचा समोर तक्रार आली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांची भेट घेऊन बॅँकेत काही व्यवहार संशयास्पद झाल्याचे सांगीतले.

सिध्देवाडी शाखेतील काही कर्मचार्‍यांनीच स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांची भेट घेऊन बॅँकेत काही व्यवहार संशयास्पद झाल्याचे सांगीतले. या पार्श्वभुमीवर वाघ यांनी तासगाव तालुक्यातील जिल्हा बॅँकेच्या सर्वच शाखांची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. यासाठी अन्य तालुक्यातील आठ अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन अधिकार्‍यांचे एक पथक अशी चार पथके स्थापन करून सर्व शाखा तपासल्या जाणार आहे. यातून मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज