rajkiyalive

sangli bank news : देशातील कोणत्याही सनदी लेखापालांना घेऊन जिल्हा बँकेचा कारभार तपासावा

sangli bank news : देशातील कोणत्याही सनदी लेखापालांना घेऊन जिल्हा बँकेचा कारभार तपासावा : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर चुकीचे आरोप करण्यापेक्षा मुंबई, पुणे तसेच देशातील कोणत्याही सनदी लेखापालांना घेऊन जिल्हा बँकेचा कारभार तपासावा, असे आव्हान जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी आ. गोपीचंद पडळकर व आ. सदाभाऊ खोत यांना दिलेे.

sangli bank news : देशातील कोणत्याही सनदी लेखापालांना घेऊन जिल्हा बँकेचा कारभार तपासावा

मानसिंगराव नाईकांचे आ. पडळकर, आ. खोत यांना आव्हान

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभारावर भाजपचे आ. गोपीचंद पडळकर व आ. सदाभाऊ खोत यांनी विधीमंडळात लक्षवेधी उपस्थितीत करत बँकेवर प्रशासक नेमण्याची मागणी केली होती. याला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी उत्तर दिले. 
ते म्हणाले, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या गेल्या तीन वर्षात बॅँकेने सर्वच बाबतीत प्रगती केली आहे. रिझर्व्ह बॅँक, नाबार्ड व सहकार विभागाचे सर्व निकष पूर्ण केले आहेत. मी अध्यक्ष झाल्यापासून गेल्या तीन वर्षात बॅँकेच्या ठेवीमध्ये 2400 कोटीची वाढ झाली असून आज अखेर 8 हजार 200 कोटीच्या ठेवी आहेत. बॅँकेच्या कर्जपुरवठ्यात 1800 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मार्च अखेर ठेवींमध्ये आणखीन काही कोटींची वाढ होईल.

sangli-bank-news-any-chartered-accountant-in-the-country-should-be-brought-in-to-inspect-the-operations-of-the-district-bank

जिल्हा बॅँकेत कोणत्याही प्रकारचा गैरकारभार, अनियमीतता माझ्या काळात झालेली नाही. जे काही आरोप, टीका होत आहे ती गेल्या संचालक मंडळाच्या काळातील कारभारावर आहे. त्याची चौकशी सुरु आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईलच. पण आता बॅँकेची नाहक बदनामी केली जात आहे? यामुळे बॅँकेच्या सभासद, ठेवीदार व ग्राहकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे. त्यामुळे बॅँकेवर आरोप करण्यापेक्षा आमदार पडळकर, आमदार खोत यांनी कोणताही सी. ए. घेवून यावे व बॅँकेच्या कारभाराची तपासणी करावी, असे आव्हान नाईक यांनी दिले.

दोन्ही आमदारांनी एस.टी. बँक बंद पाडली…

आ. गोपीचंद पडळकर व आ. सदाभाऊ खोत यांनी एस. टी. बॅँकेविरोधात आंदोलन केले. दुर्दैवाने नंतर ती बॅँक बंद पडली. त्यामुळे त्यांनी आंदोलन करताना, आरोप करताना वस्तुस्थिती जाणून घ्यावी. चुकीच्या, खोट्या माहितीच्या आधारे आरोप, आंदोलन केल्यास आर्थिक संस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत सगळ्यानीच खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज