sangli bank news : जिल्हा बँकेने काढलेल्या पाच सूतगिरण्याच्या लिलाव प्रक्रियेकडे खरेदीदारांनी पाठ फिरवली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काढलेल्या पाच सूतगिरण्याच्या लिलाव प्रक्रियेकडे पुन्हा खरेदीदारांनी पाठ फिरवली. पाचपैकी केवळ एका सुतगिरणीसाठी एक निविदा दाखल झाली. या लिलावास शून्य प्रतिसाद न मिळाल्याने बॅँकेने ही प्रक्रिया रद्द केली आहे. महिन्याभरात पुन्हा फेरलिवाव काढण्यात येणार आहे. आता या सुतगिरण्याकडील थकित कर्ज सुमारे 134.42 कोटी रुपये मार्च 2025 पूर्वी वसुल होणे शक्य नसल्याने बँकेसमोरील अडचणी वाढणार आहेत.
sangli bank news : जिल्हा बँकेने काढलेल्या पाच सूतगिरण्याच्या लिलाव प्रक्रियेकडे खरेदीदारांनी पाठ फिरवली
पाच सूतगिरण्यांच्या लिलावास प्रतिसाद मिळेना, पुढील महिन्यात फेरलिलाव काढणार
जिल्ह्यातील पाच सूतगिरण्यांवर जिल्हा बॅँकेत थकीत कर्ज वसुलीसाठी कारवाईचा बडगा उगारत या सूतगिरण्यांची मालमत्ता विक्री लिलाव जाहीर केला. संबधित सूतगिरण्यांकडे तब्बल 134.42 कोटी रुपयांची केवळ मुद्दलाची थकबाकी असून, त्यावरील कोट्यवधींचे व्याज वेगळे आहे. बॅकेने यापूर्वीही या सुतगिरण्यांचा लिलाव जाहीर केला होता. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आताही तेच झाले आहे. निवीदा दाखल करण्याच्या अंतीम मुदतीत केवळ एका सुतगिरणीसाठी एकमेव निवीदा दाखल झाली. अन्य चार सूतगिरण्यांसाठी एकही निवीदा दाखल झालेली नाही. नियमानूसार तीन निवीदा दाखल झाल्यातरच लिलाव प्रक्रिया राबवली जाते. त्यामुळे या पाचही सूतगिरण्याचा लिलाव रद्द करण्यात आला आहे. महिन्याभरात पुन्हा एकदा फेर लिलाव काढला जाणार आहे.

स्वामी रामानंदभारती सहकारी सूतगिरणी तासगाव, खानापूर तालुका को ऑप स्पिनिंग मिल्स विटा, शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी इस्लामपूर, प्रतिबिंब मागासवर्गीय को ऑप इंडस्ट्रिज इस्लामपूर व विजयालक्ष्मी कॉटन मिल्स आटपाडी या पाच सूतगिरण्यांच्या मालमत्ता विक्रीसाठी निवीदा मागवल्या होत्या. या सर्व सूतगिरण्यांकडे मिळून डिसेंबर 2024 अखेर केवळ मुद्दलाची 134 कोटी 42 लाख 52 हजार रुपये थकबाकी आहे. यातील तीन सूतगिरण्या बॅँकेने स्वत: खरेदी केलेल्या आहेत.
महिन्याभरात फेर निविदा मागवणार
जिल्हा बॅँकेने काढलेल्या पाच सूतगिरण्यांच्या लिलावासाठी एका सुतगिरणीसाठी एकच निविदा दाखल झाली. उर्वरित चारसाठी एकाही निविदा आली नाही. ही लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. या सुतगिरण्यांची अपसेट प्राईज थोडी कमी करून पुन्हा एकदा महिन्याभरात फेर लिलाव काढला जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.


Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



