जिल्हा बँकेची 52 कोटीची थकबाकी, 70 लाख वसूल
sangli bank news : साडेपाच हजार मयत शेतकर्यांच्या वारसांना नोटीस : जिल्हा मध्यवर्ती बँकेने मार्चएण्डच्या पार्श्वभूमीवर कजे असलेले मात्र मयत झालेल्या 5 हजार 497 शेतकर्यांच्या वारसांना वसुलीच्या नोटीसा देण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्याकडे 52 कोटी रुपये थकीत आहेत. बॅक प्रशासनाने मयतांच्या वारसांचे पत्ते शोधून नोटीसा देत आहेत. आतापर्यंत 325 मयत वारसांना नोटीसा दिल्या असून 70 लाख रुपये वसुली झाली आहेत. दरम्यान थकित 59 हजार शेतकर्यांपैकी 40 हजार जणांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
sangli bank news : साडेपाच हजार मयत शेतकर्यांच्या वारसांना नोटीस
मार्चएण्डला अवघे दीड महिने राहिले आहेत. बँकेचा एनपीए कमी करण्यासह सव्वादोनशे कोटी रुपये ठोबळ नफ्यासाठी आतापासूनच थकबाकी वसुलीसाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून बड्या नेत्यांच्या सबंधित पाच सुतगिरण्याचा लिलाव नोटीस काढल्या आहेत. मयत शेतकर्यांसह थकबाकीदार शेतकर्यांनाही 101 च्या नोटीसा बजावल्या जात आहेत. मार्च अखेर वसुलीसाठी सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरु ठेवण्यात आहे.
जिल्हा बँक विकास सेवा सोसायट्यांच्या मदतीने कर्जवाटप करते.
5 हजार 497 कर्जदार मयत झाले आहेत. त्यांच्याकडील 52 कोटी थकीत वसुलीसाठी फारसे कोणी प्रयत्न झालेले नाहीत. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्या वारसांना नोटीस देण्याचा निर्णय झाला आहे. त्यांची तातडीने अंमलबजावणी केली जात आहे. त्यांचे मयत वारस शोधून नोटीसा दिल्या जात आहेत. त्यासाठी बँक कर्मचारी प्रसंगी तलाठी, ग्रामसेवक यांच्याशीही संपर्क साधत आहेत.
जिल्ह्यातील 59 हजार शेतकरी थकीत आहेत.
त्यातील 40 हजार जणांना नोटीस देण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विकास सेवा सोसायटीकडून नोटीसा देण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यातील अनेक गावच्या सोसायटीचे संचालक नोटीसासाठी राजी नाहीत. सोसायट्यांचे सचिव मात्र नोटीसांसाठी आग्रही आहेत. जिल्हा बँक प्रशासनाने नोटीसांबाबत सचिवांकडे तगादा बँक प्रशासनाने लावला आहे.
वसुलीस मदत न करणार्या सोसायटीवर कारवाईची शिफारस
थकबाकी वसुलीसाठी विकास सोसायट्या मदत करणार नाहीत. त्यांचे संचालक मंडळ बरखास्तीची शिफारस सहकार उपनिबंधक यांच्याकडे करीत आहे. आमच्या उद्देशानुसार कार्यवाही होत नसेल तर संचालक मंडळ बरखास्तीबाबत शिफारशीचा बँक प्रशासनाला अधिकार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



