sangli congli news : सांगलीच्या समस्या मार्गी लावण्यासाठी वकिलांची साथ मोलाची: पृथ्वीराज पाटील : सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देताना त्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्याची प्रेरणा वकीलच देतात. सांगली शहरातील समस्या आणि भविष्यातील सांगली कशी असावी याबाबत उत्तम मार्गदर्शन वकील करु शकतात, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी केले.
sangli congli news : सांगलीच्या समस्या मार्गी लावण्यासाठी वकिलांची साथ मोलाची: पृथ्वीराज पाटील
सांगली बार असोसिएशनमध्ये पृथ्वीराज पाटील यांनी वकिलांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बार असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र रजपूत वकील यांनी स्वागत करुन मागण्यांचा तपशील सादर केला. यावेळी जे. व्ही. पाटील, उत्तमराव निकम, पी. टी. जाधव, जयंत नवले, अमोल चिमाण्णा, विजय चव्हाण, सर्जेराव मोहीते, अशोकराव वाघमोडे, पल्लवी कांते मॅडम आदी उपस्थित होते.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, कनिष्ठ न्यायालयापासून सुप्रिम कोर्टापर्यंत कार्यरत न्यायाधीश आणि न्यालायीन कर्मचारी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा खरा सन्मान करतात. भारतीय स्वातंत्र्य लढा हा प्रामुख्याने वकील असलेल्या नेत्यांनी जनतेच्या बळावर यशस्वी केला. संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेही वकिलच होते. सहकार तपस्वी माजी खासदार माझे वडील स्व. गुलाबराव पाटील हे वकिलच होते. गेल्या पाच वर्षांत सांगलीकरांसाठी मला जे जे करणे शक्य होते ते केले आहे. कोराना व महापूर काळात केलेल्या मदतीबद्दल सांगलीकर कायम कृतज्ञता व्यक्त करतात. सांगली कायमस्वरूपी पूरमुक्त व्हावी हा माझा ध्यास आहे.
नागरिकांना शुध्द व मुबलक पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, उद्योग व्यापारवृध्दी,कृषिविकास,रोजगार निर्मिती, महिला संरक्षण, गुणवत्तायुक्त शिक्षण व आरोग्य आणि विशेषकरून समताधिष्ठीत समाज रचना यासाठी मला विधानसभेत पाठवा. विद्यमान आमदारांकडे क्षमता व दूरदृष्टीचा अभाव असल्याने सांगलीचा विकास कुंठित झाला आहे. सांगलीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मला पाच वर्षे आमदार म्हणून संधी द्या. असे आवाहन केले. तर शहराचा विकास आराखडा राबवतात मला वकिलांचे मार्गदर्शन अधिक उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे तुमचा आशीर्वाद आणि पाठबळ मला अधिक उर्जा देणारी आहे.
अनेक वर्षे प्रलंबित व मंजूर असलेले कोल्हापूर खंडपीठ तातडीने व्हावे, झारखंड व कर्नाटक राज्यांप्रमाणे ज्युनिअर वकिलांना दरमहा 5 हजार स्टायफंड मिळावा, वकिल भवनाची उभारणी करावी, वकिलांना पेन्शन मिळावे यासाठी आमदार म्हणून शासन दरबारी आमच्या मागण्या लावून धराव्यात यासाठी आम्ही आपल्या पाठिशी असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.