rajkiyalive

sangli congress news : लाडक्या बहिणी पृथ्वीराज पाटलांच्या पाठीशी राहतील: विजया पाटील

sangli congress news : लाडक्या बहिणी पृथ्वीराज पाटलांच्या पाठीशी राहतील: विजया पाटील: गेल्या दहा वर्षांपासून पृथ्वीराज पाटील सांगलीकरांची सेवा करत आहेत. कोरोना व महापुराच्या काळात चांगले काम केले आहे. त्यामुळे महिलांचा देखील चांगला प्रतिसाद आहे. पृथ्वीराज पाटील हेच लाडक्या बहिणींचे भाव असल्याची त्यांची प्रतिक्रिया आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी त्यांच्या पाठीशी उभ्या राहतील, असा विश्वास विजया पाटील यांनी व्यक्त केला.

sangli congress news : लाडक्या बहिणी पृथ्वीराज पाटलांच्या पाठीशी राहतील: विजया पाटील

महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला आशा पाटील, प्रणिता पवार, ज्योती सुर्यवंशी,कविता बोंद्रे, सुवर्णा पाटील, जयश्री घोरपडे, ज्योती आदाटे, भारती भगत, संगीता हारगे, विद्या कांबळे, नूतन पवार, प्रियांका पाटील आदी उपस्थित होत्या.
विजया पाटील म्हणाल्या, गेली 10 वर्षे पायाला भिंगरी बांधून सांगलीकरांच्या सेवेसाठी पृथ्वीराज पाटील काम करत आहेत. महापुरात पूरप्रवण क्षेत्रातील अनेक महिलांचे संसार वाचवण्यासाठी त्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करुन पूर ओसरुपर्यंत त्यांची सगळी व्यवस्था केली.

पूर ओसरल्यानंतर त्यांच्या घराची परिसराची स्वच्छता, निर्जंतुकीकरणासाठी गाड्या पाठवून औषध फवारणी केली. कोरोना काळात त्यांनी औषधे, सॅनिटायझर व कोविड सेंटरमध्ये व्यवस्था करुन जीवदान दिले. त्यामुळे पृथ्वीराज पाटील हेच खरे लाडके भाऊ आहेत, अशी सांगलीकर महिलांची भावना आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातील महिला पृथ्वीराज पाटील यांना भरघोस मतांनी निवडून आणतील.

काँग्रेस पक्षाचे आणि सांगलीकरांच्या हिताचे काम पाहूनच त्यांना उमेदवारी दिली असल्याचे विजया पाटील यांनी सांगितले. यावेळी महागाई, बेरोजगारी, महिलावरील अत्याचार या विषयावर भाजपा सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. महिलांचे जीवन धोक्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत सांगलीच्या अकार्यक्षम आमदाराला बदलण्यासाठी सांगलीकर महिला पुढे सरसावल्या आहेत अशा प्रतिक्रिया यावेळी महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी कांचन तुपे, मालन घाडगे, संगीता पवार, क्रांती कदम, शोभा पवार, छाया जाधव, आश्विनी देशपांडे, उज्ज्वला निकम, प्रतिक्षा काळे, जन्नत व शमशाद नायकवडी, राणी कामटे, अनिता शिवशरण, रेहान शेख, सुरेखा सातपुते, सुरेखा हेगडे, अनिता चोपडे, संगीता जाधव आदी उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज