पक्षनिरीक्षकांसमोर शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मांडले जळजळीत वास्तव
sangli congress news : निष्ठावंतावर अन्याय आणि बंडखोराला पायघड्या यामुळे सांगली काँग्रेस संपण्याच्या मार्गावर : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा पराभव काँग्रेस मधील बंडखोरीमुळे झाला त्याचा बंदोबस्त करण्याची सूचना पक्षाच्या वरिष्ठाकडे करणार का? , पक्षात वैचारिक भूमिका महत्त्वाची आहे.. त्याशिवाय संघटन मजबूत होणार नाही. महापालिका निवडणुकीत एका गटाचे उमेदवार येतील पण काँग्रेस पक्षाची सत्ता येणार नाही यावर काय उपाय करणार? काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसचा पराभव केला त्यामुळे निष्ठेने काम केलेल्या कार्यकर्त्यांची सोळा वर्षे वाया गेली याला जबाबदार कोण?
sangli congress news : निष्ठावंतावर अन्याय आणि बंडखोराला पायघड्या यामुळे सांगली काँग्रेस संपण्याच्या मार्गावर
बंडखोर उमेदवाराचा प्रचार केलेल्यांना महापालिका उमेदवारी देऊ नका, त्यांच्यावर कारवाई करणार का? मतदार संघात राज्य आणि केंद्र स्तरावरील काँग्रेस पक्षाचे किती पदाधिकारी व नेते आले? अशा प्रश्नांचा भडीमार आज काँग्रेस भवनमध्ये आयोजित बैठकीत प्रदेश काँग्रेस कमिटीचे पक्ष निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्या समोर शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला.
स्वागत बिपीन कदम यांनी केले. प्रास्ताविक करताना शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, ’कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जातो, निष्ठावंतावर अन्याय आणि बंडखोरांना पायघड्या ही कसली संस्कृती? सामान्य निष्ठावंत कार्यकर्ते ही पक्षाची ताकद असते, सांगली विधानसभा निवडणुकीत जो प्रकार स्वकियांनी केला त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ असून त्यांच्या मनात असंतोष धुमसत आहे. अय्याजभाई नायकवडी, आशिष कोरी, अनिल मोहिते, अँड.अमोल चिमाण्णा, राजेंद्र कांबळे बिपीन कदम, डी. पी. बनसोडे, प्रकाश बरडोले, भारती भगत, सनी धोतरे यांनी तर काँग्रेसचे गटबाजी करणारे नेतेच काँग्रेस संपवत आहेत असे सांगून काँग्रेस पक्ष कोण संपवत आहेत याची जंत्रीच मांडली.
यावेळी पक्षीनिरीक्षक माजी आमदार रामहरी रुपनवर म्हणाले, ’महाराष्ट्रातील निवडक पराभवात पृथ्वीराज पाटील यांच्या पराभवाचा समावेश होतो. आपल्याच लोकांनी आपलाच उम पाडला हे फार चुकीचे झाले. अशाने काँग्रेस पक्ष पुढे जाणार नाही. काँग्रेसचा पराभव करणे म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विशेष बैठकांचे सत्र आयोजित केले आहे.
मरगळ झटकून कामाला लागा, येणार्या महापालिका, जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. बूथ यंत्रणा सक्षम करु या. सकारात्मक प्रतिसाद दिला तर काँग्रेस सत्तेवर येईल.’सांगलीत जे घडले त्याचे दुःख आम्हालाही आहे. वस्तुस्थितीचा अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला दिला जाईल.
sangli-congress-news-sangli-congress-is-on-the-verge-of-ending-due-to-injustice-to-the-loyalists-and-trampling-on-the-rebels
जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटन कामाचा आढावा घेण्यासाठी पक्षनिरीक्षकांनी बोलावलेल्या या बैठकीस अजिजभाई मेस्त्री,प्रा. एन.डी.बिरनाळे, अँड ऐ.ऐ. काझी, अल्ताफ पेंढारी, आनंदराव पाटील सांगलीवाडी , अशोकसिंग रजपूत,याकूब मणेर, समीर मुजावर, इरफान केडिया, शमशाद व जन्नत नायकवडी, रामभाऊ पाटील, अख्तर अत्तार, आयुब निशाणदार, प्रशांत अहिवळे, अरुण पळसुले,आशिष चौधरी, श्रीकांत साठे, शहाबाज नायकवडी, वसीम रोहिले, अरुण गवंडी, अरुण पळसुले, शकील गोदड, अजित भांबुरे, रमीज शेख, सूर्यकांत लोंढे, अल्ताफ कंकणवाडी, मौलाली वंटमोरे, याकूब मनेर, प्रशांत अहिवळे, बसगोंडा पाटील, व शहर जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. आभार पैगंबर शेख यांनी मान

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



