rajkiyalive

SANGLI CONGRESS : विशाल पाटील काँग्रेस स्नेहमेळाव्यात: उध्दव ठाकरे सेनेचा पारा चढला

SANGLI CONGRESS : विशाल पाटील काँग्रेस स्नेहमेळाव्यात: उध्दव ठाकरे सेनेचा पारा चढला

निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत वाद सुरूच

जनप्रवास । सांगली

SANGLI CONGRESS : विशाल पाटील काँग्रेस स्नेहमेळाव्यात: उध्दव ठाकरे सेनेचा पारा चढला : लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसच्यावतीने कार्यकर्त्यांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी हजेरी लावून सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे निवडणुकीच्या निकालात काँग्रेसची साथ कोणाला हे स्पष्ट झाले आहे. मात्र यामुळे शिवसेना (उबाठा) गटाच्या पारा आणखी चढला असून त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मतमोजणी दहा दिवसांवर आली आहे. निकाल लागल्याने आणखी वाद उफाळण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला गेली होती. तेथून महाविकास आघाडीने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. याविरोधात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भूमिका घेतली होती. स्थानिक काँग्रेसने विशाल पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी केली होती. परंतु, उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे सांगलीची लढाई विशाल पाटील, चंद्रहार पाटील व संजयकाका पाटील अशी तिरंगी झाली होती.

विशाल पाटील यांच्या विजयाच्या आशा असल्याने या स्नेहमेळावाचे आयोजन केल्याचे बोलले जात होते.

काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार राहिलेले विशाल पाटील यांच्यासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी झटून काम केल्याने आणि विशाल पाटील यांच्या विजयाच्या आशा असल्याने या स्नेहमेळावाचे आयोजन केल्याचे बोलले जात होते. तसेच या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून आगामी काळात पार पडणार्‍या विधानसभा निवडणुकात एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या स्नेहमेळाव्यात काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम, लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या स्नेहभोजनासाठी उपस्थिती लावल्याने आता सांगलीत चर्चांना उधाण आली होती.

यापूर्वी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात विश्वजीत कदम हे कोणाच्या बाजूने आहेत हे चार जून रोजी कळेल, असे विधान विश्वजीत कदम यांनी केले होते. तर खा. संजयकाका पाटील यांनी विश्वजीत कदम यांच्यावर आघाडी धर्म पाळला नसल्याची टीका केली होती. याला विशाल पाटील यांनी जोरदार उत्तर दिले होते. आता विशाल पाटील यांनी लावलेल्या स्नेहमेळाव्यावरून शिवसेना (उबाठा) गटाचा पारा चढला आहे. जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मात्र महाविकास आघाडीची उमेदवारी ही चुकीच्या पध्दतीने दिली असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने कोणाला मदत केली. हे चित्र दि. 4 जूनला निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे भविष्यात काँग्रेस व उध्दव ठाकरे सेनेचा वाद आणखी रंगणार आहे.

विशाल पाटील काँग्रेसचे: कारवाई नाहीच

विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केल्यानंतर त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) गटाने केली होती. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी विशाल पाटील यांच्यावर कारवाईसाठी काँग्रेस नेत्यांवर प्रचंड दबाब आणला होता. मात्र विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्यास पक्षाने टाळाटाळ केली. त्यामुळे ते काँग्रेसचेच असल्याने त्यांनी कार्यकर्त्यांच्या स्नेहमेळाव्यासाठी उपस्थिती लावली होती.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज