rajkiyalive

SANGLI CRIME : जिल्ह्यात खासगी सावकारीच्या 92 तक्रारी

 

जनप्रवास । प्रतिनिधी
SANGLI CRIME : जिल्ह्यात खासगी सावकारीच्या 92 तक्रारी : सांगली ः जिल्ह्यात खासगी सावकारांकडून जादा दराने व्याज आकारणी करुन वसुली केल्याबद्दलच्या तब्बल 92 तक्रारी दाखल झाल्या आहेत. बेकायदेशीर व्याज वसुलीप्रकरणी तक्रारी निकालात काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बुधवारी दिले. सावकारांकडे तारण असलेल्या पाच तक्रारदारांची 62 हेक्टर जमीन परत मिळवून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

SANGLI CRIME : जिल्ह्यात खासगी सावकारीच्या 92 तक्रारी

जिल्ह्यात 610 परवानाधारक सावकर आहेत, या सावकारांना कर्ज दिल्यानंतर व्याज शेतकरी तारणावर 9 टक्के आणि विना तारण 15 टक्के व्याज दर तर बिगरशेतीसाठी तारणावर 15 टक्के आणि विना तारणावर 18 टक्के व्याज आकारणी करणे बंधनकार आहे. परंतु काही सावकारांकडून त्यापेक्षा जादा आकारणी करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जादा व्याज आकारणी करणार्‍या सावकारांच्या 92 तक्रारी दाखल झाल्या आहेत. या सर्व तक्रारी तात्काळ निकालात काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी दिले आहेत.

पाच तक्रारदारांना 62 हेक्टर जमीन परत दिली ः जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सावकरांना तारण देण्यात आलेली जमीन कर्ज फेडीनंतरही दिली जात नसल्याबाबतच्या सात तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी 5 प्रकरणांमध्ये 62 हेक्टर 16 गुंठे इतकी स्थावर मालमत्ता महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 मधील कलम 18 अंतर्गत चौकशी करुन परत करण्यात आली आहे. गरजू व्यावसायिक, नागरिक व शेतकरी यांनी सहकार खात्याकडून सावकारी परवाना घेतलेल्या सावकारांकडूनच कर्जाची रक्कम घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. याशिवाय खासगी सावकारांकडून जादा व्याज आकारणीसाठी पिळवणूक करीत असल्यास पोलीस ठाणे अथवा पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी केले.

अवैध सावकारीची तक्रार द्या ः मंगेश सुरवसे

परवाना नसतांना अवैध सावकारी करणार्‍या व्यक्तीस सावकारी अधिनियमाच्या कलम 39 अन्वये पाच वर्षाचा कारावास व 50 हजार दंडाची तरतूद आहे. तरी सावकारांच्या जाचाने पिडीत झालेल्या कर्जदारांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली अथवा संबंधित तालुक्याचे उपनिबंधक सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयाशी योग्य त्या पुराव्यानिशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज