rajkiyalive

SANGLI CRIME : चुकीचा उपचार करणार्‍या डॉक्टरांना ग्राहक न्यायालयाचा दणका : 11 लाख 60 हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश.

सांगली :

SANGLI CRIME : चुकीचा उपचार करणार्‍या डॉक्टरांना ग्राहक न्यायालयाचा दणका : 11 लाख 60 हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश. : शिराळा तालुक्यातील एका रुग्णालयात चुकीचा उपचार करून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी डॉक्टरांना ग्राहक न्यायालयाने दणका दिला आहे. डॉक्टर प्रकाश बाळू मकामले (रा. कुंभारेवाडी, येळापूर, ता. शिराळा) यांनी रुग्णाच्या वारसांना 11 लाख 60 हजारांची भरपाई देण्याचे तसेच त्यांच्या विरोधात फिर्याद नोंदवून कारवाईचे आदेश सांगली येथील ग्राहक न्यायालयाने दिले आहेत. न्यायाधिश प्रमोद गोकूळ गिरिगोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती मनिषा वनमोरे यांच्या पिठाने हा निर्णय दिला. दरम्यान, वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसताना मखमले यांनी उपचार केल्याचे न्यायालयात यावेळी सिद्ध झाले.

SANGLI CRIME : चुकीचा उपचार करणार्‍या डॉक्टरांना ग्राहक न्यायालयाचा दणका : 11 लाख 60 हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जालिंदर महादेव माळी हे 1987 पासून एस.टी. महामंडळामध्ये वाहक म्हणून कार्यरत होते. 2021 पासून त्यांना संधीवात व मणक्याचा आजार सुरु झाला. सन 2022 मध्ये त्यांच्या वाचनामध्ये एक जाहिरात आली. त्यानुसार दि.10 जुलै 2022 रोजी ते कुंभरेवाडी येथील प्रकाश किरण आयुर्वेदिक व अ‍ॅक्युपेशर केंद्र येथे गेले. तेथे त्यांनी 500 रुपयाचा केस पेपरसाठी व इतर खर्च म्हणून 250 रुपये भरले. डॉ. प्रकाश मकामले यांनी त्यांच्याकडील कपडे माळी यांना घालण्यास दिले व बायो हेल्थ या उपकरणांवर झोपण्यास सांगितले आणि ते उपकरण सुरु करण्याचे बटन दाबले.

या 25 मिनिटाच्या उपचारामध्ये माळी यांना अस्वस्थ वाटू लागले व जोर जोरात ओरडू लागले. या उपचारानंतर डॉक्टरांनी सांगितले की, अशा प्रकारे सात वेळा रुग्णाला उपचार घ्यावे लागतील. त्यानंतर दूसर्‍या फेरीच्या उपचारासाठी जालिंदर हे 10 नोव्हेंबर 2022 रोजी गेले. या उपचारा दरम्यान देखील त्यांना त्रास होत होता. घरी गेल्या नंतर त्यांना जास्तच अस्वस्थ वाटू लागले म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी डॉक्टरांना फोन केला त्यानंतर डॉक्टरांनी माळी यांच्या घरी जावून दोन इंजेक्शन दिले तरी सुध्दा त्यांना काही फरक पडला नाही. त्यानंतर जालिंदर माळी यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना याबाबत जाब विचारला असता तीन लाख रुपये द्या मी खात्रीशीररित्या रुग्णाला बरे करतो असे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी कर्ज काढून डॉक्टरांना तीन लाख रुपये दिले.

परंतू रुग्णाला कोणताही दिलासा मिळाला नाही. उलट जास्तच त्रासच होवू लागला. म्हणून नातेवाईकांनी या डॉक्टर बाबत सखोल चौकशी केली असता तो डॉक्टरच नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले म्हणून त्यांनी त्या डॉक्टरांचे विरोधात शिराळा पोलीसात तक्रार दिली. पोलीसांनी त्या तक्रारीची दखल घेतली नाही. दरम्यानच्या काळात जालिंदर माळी यांची प्रकृती अचानकपणे खालावली त्यांच्यावर सांगली, कोल्हापूर व मिरज येथील विविध दवाखान्यामध्ये उपचार केले. परंतू त्याचा काही उपयोग झाला नाही व यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी माळी कुटुंबियांच्यावतीने सांगली येथील ग्राहक न्यायालयामध्ये अ‍ॅड. आर.बी. पाटील व अ‍ॅड. पी.बी. पाटील यांच्या मार्फत तक्रार दाखल केली. प्रकाश मकामले हा डॉक्टर नसलेचे तसेच त्याने चूकीचे उपचार केल्याचे न्यायालयामध्ये सिद्ध झाले.

यानंतर रुग्णाच्या वारसांना औषधोपचार व इतर खर्चापोटी 11 लाख रुपये 30 दिवसांत द्यावेत, जिल्हा पोलीस अधिक्षक व पोलीस निरिक्षक शिराळा यांनी तात्काळ फिर्याद नोंदवून कायदेशीर कारवाई करावी, जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रकाश मकामले यांचा वैद्यकीय परवाना व पदवी बाबत 15 दिवसांत न्यायालयात अहवाल द्यावा व योग्य कारवाई करावी, शारिरिक व मानसिक त्रासापोटी 50 हजार रुपये आणि अर्जाचा खर्च म्हणून 10 हजार रुपये मकामले यांनी मयत व्यक्तीच्या वारसांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज