rajkiyalive

sangli crime : अल्पवयीन विद्यार्थीनींचा नराधम शिक्षकाकडून विनयभंग, कवठे महांकाळ तालुक्यातील घटना

कवठेमहांकाळ (प्रतिनिधी):-

 sangli crime : अल्पवयीन विद्यार्थीनींचा नराधम शिक्षकाकडून विनयभंग, कवठे महांकाळ तालुक्यातील घटना : एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने तीन विध्यार्थीनींशी अश्लील चाळे करून विनयभंग केल्याची धक्कादायक प्रकार कवठे महांकाळ तालुक्यातील एका गावात घडला आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी उघडकीस आला आहे. भरत विश्वनाथ कांबळे (वय 48) रा.सुभाषनगर ता.मिरज असे त्या नराधम शिक्षकांचे नाव आहे.

sangli crime : अल्पवयीन विद्यार्थीनींचा नराधम शिक्षकाकडून विनयभंग, कवठे महांकाळ तालुक्यातील घटना

पोलिस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, याबाबत संबधीत विद्यार्थीनींच्या आईने कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. कवठेमहांकाळ पोलिसात त्या नराधम शिक्षकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावातील वस्ती भागात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. या वस्ती शाळेत इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी पर्यंत वर्ग आहेत. भरत कांबळे हा नराधम शिक्षक इयत्ता चौथीच्या वर्गाला शिकवित होता. सदर शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकवत असताना शिक्षक इयत्ता चौथीच्या वर्गातील मुलींबरोबर अश्चिल वर्तन करत असल्याचा प्रकार 4 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर पर्यंत या दिवसांपासून सुरू होता.

संबधीत विद्यार्थिनींनी हा प्रकार घरी आईवडिलांना सांगितला. यावेळी पालकांनी काही वेळा दुर्लक्ष केले. परंतु हा प्रकार वारंवार होत असल्याने संबधीत पालकांनी त्या प्रकारावर लक्ष ठेऊन राहिले होते. यावेळी नेहमी प्रमाणे कांबळे हा शिक्षक सोमवारी चौथीच्या वर्गात शिकवत असताना नेहमी प्रमाणे मुलींबरोबर अश्चिल प्रकार शिक्षकाने सुरू केला. यावेळी लक्ष ठेवून असलेल्या पालकांच्या हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला.

संबधीत पालकांनी हा प्रकार कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यास सांगितला व फिर्याद दिली आहे.
कवठेमहांकाळ पोलिसांनी याप्रकरणी नराधम शिक्षक भरत कांबळे या शिक्षकांवर विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक जोतिराम पाटील करीत आहेत. ——-

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज