rajkiyalive

sangli crime news : विषारी वायू गळती दुर्घटना : बोंबळेवाडी (शाळगाव) एमआयडीसी मध्ये 3 कामगारांचा मृत्यू,

7 जण अत्यवस्थ : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…

बोंबळेवाडी शाळगाव तालुका कडेगाव एमआयडीसी येथील मॅनमार कंपनीत विषारी वायू गळतीमुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 3 कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर 7 जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. गळती झालेल्या वायूचा परिणाम आसपासच्या वस्तीवर आणि गावावरही झाला असून, नागरिकांना उलट्या, डोळ्यात जळजळ आणि श्वास कोंडल्यासारखा त्रास होत आहे.

गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता मॅनमार कंपनीतील टाकीतून विषारी वायू गळती झाली.यामुळे या कंपनीतील तसेच एमआयडीसीतील आणि जवळच्या वस्तीवरील लोकांना त्रास सुरू झाला .अनेक जन बेशुद्ध पडले.यामुळे त्यांना

तातडीने कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र या दुर्घटनेत सुचिता राजेश उथळे (वय 45) राहणार येतगाव तालुका कडेगाव, नीलम मारुती रेठरेकर (वय 35) राहणार मसूर तालुका कराड, किशोर तात्यासो सापकर (वय 40) राहणार बोंबाळेवाडी तालुका कडेगाव या तिघांचा मृत्यू झाला. तसेच 7 जण व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर असल्याची माहिती आहे.विषारी वायूमुळे बेशुद्ध पडलेले अनेक कामगार आणि नागरिक गंभीर अवस्थेत आहेत. घटनास्थळी तात्काळ मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.

विश्वजित कदम व पृथ्वीराज देशमुख यांची घटनास्थळी भेट:

आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.कराड येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस केली. उपाययोजनाबाबत प्रशासनास निर्देश दिले. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी देखील तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि मदतीसाठी आवश्यक ती पावले उचलली.

केमिकल कंपन्या बंद करा : ग्रामस्थ आक्रमक

बोंबाळेवाडी एमआयडीसी दुर्घटनेत केमिकल कंपनीतील तीन कामगारांचा मृत्यू झाला तर अन्य सातजण गंभीर झाले.त्यामुळे आक्रमक झालेल्या बोंबाळेवाडी,शाळगाव येथील ग्रामस्थांनी एमआयडीसीतील केमिकल कंपन्यामध्ये जाऊन या कंपन्या तात्काळ बंद करण्याची जोरदार मागणी केली.तर ग्रामस्थांची आक्रमकता पाहून येथील उद्योजकांनी आज सर्व कंपन्या बंद ठेवल्या.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज