निवृत्त बँक कर्मचार्यांची ऑनलाईन फसवणूक : अज्ञातांवर गुन्हा दाखल.
sangli crime news : सांगलीत डिजिटल अरेस्टची भीती घालून तब्बल 21 लाखांना घातला गंडा: सांगली : बँकेतील निवृत्त कर्मचार्यास अकाऊंट सस्पेंड होईल अशी डिजिटल अरेस्टची भीती घालून ऑनलाईन ‘केवायसी’ पूर्ण करतो असे सांगून खाते ‘हॅक’ करत तब्बल 21 लाख 75 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार आज उघडकीस आला. बँकेचे अधिकारी बोलत असल्याचे सांगून बँक खात्यातून ऑनलाईन पैसे काढून घेण्यात आले. या फसवणुकीबाबत दिलीप मारूतीराव शिंदे (रा. प्रथमेश बंगला, घनशामनगर, सांगली) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
sangli crime news : सांगलीत डिजिटल अरेस्टची भीती घालून तब्बल 21 लाखांना घातला गंडा
याबाबत अधिक माहिती अशी कि, दिलीप शिंदे हे आपल्या कुटुंबियांसह घनशामनगर परिसरात राहत असून ते बँक ऑफ इंडियाचे निवृत्त कर्मचारी आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये ते घरी असताना त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून एसएमएस आला. त्यामध्ये तुमचे बँक ऑफ इंडियाचे खाते आज सस्पेंड होईल.
तुम्ही बँक व्यवस्थापक राहुल गुप्ता यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क सांगा असे नमुद केले होते.
शिंदे यांनी थोड्या वेळाने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला. तेव्हा समोरून बोलणार्या व्यक्तीने मी राहुल गुप्ता हेड ऑफीस, बँक ऑफ इंडिया मुंबई येथून बोलतो आहे असे सांगितले. तुमचे अकाऊंट सस्पेंड झाले असून ते क्टीव्ह करण्यासाठी केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आधारकार्ड क्रमांक, बँकेच्या खात्याला लिंक असलेला मोबाईल क्रमांक विचारून घेतला. तसेच एक व्हॉटस प क्रमांक देऊन त्यावर माहिती शेअर करायला सांगत मोबाईल सुरूच ठेवला.
शिंदे यांनी सांगितलेल्या व्हॉटस् प क्रमांकावर आधार कार्ड नंबर, खात्याला जोडलेला मोबाईल क्रमांक, पिन क्रमांक शेअर केला.
राहुल गुप्ता म्हणून बोलणार्या व्यक्तीने तुम्ही ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे तुमचे खाते ऑनलाईन करत आहे, असे सांगून मोबाईल चालू ठेवा अशा सूचना केल्या. 15 ते 20 मिनिटात प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगितले. परंतू एवढ्या कालावधीत शिंदे यांचे खातेच भामट्याने ‘हॅक’ केले. त्यानंतर त्यांच्या खात्यातील 21 लाख 75 हजार रूपये परस्पर काढून घेतले.
बँकेच्या खात्यातील मोठी रक्कम काढून घेतल्याचे दिसून येताच शिंदे यांना धक्का बसला.
त्यांनी दि. 15 नोव्हेंबर रोजी बँकेशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला. गेले काही दिवस तांत्रिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दि. 11 रोजी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुप्ता नामक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



