sangli crime news : कर्नाळ रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर कार ने घेतला पेट. : सांगली : कर्नाळ रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर कार ने अचानक पेटल्याचा प्रकार दुपारी बाराच्या सुमारास घडला. महापालिका अग्निशमन दलाच्या गाडीने तत्काळ घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.आगीमध्ये जळालेली मोटार (एमएच 02 सीबी 3415) ही पलूस येथील प्रतीक श्रीकांत पवार यांच्या मालकीची आहे.
sangli crime news : कर्नाळ रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर कार ने घेतला पेट.
दुपारी बाराच्या सुमारास सांगली ते कर्नाळ रस्त्यावरून जाताना रजपूत मंगल कार्यालयाजवळ असलेल्या पेट्रोलपंपासमोर मोटारीतून अचानक धूर येऊ लागला. त्यामुळे मोटार रस्त्याकडेला थांबवण्यात आली. महापालिका अग्निशमन दलाला हा प्रकार कळवला. एका गाडीने तत्काळ घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती.
आग आटोक्यात आणल्यानंतर परिसरातून वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतू परंतू शॉर्ट सर्कीटने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आगीत मोटारीचे लाखाहून अधिक नुकसान झाले आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



